“ऑनलाईन फेस्टिव्हल्स’ने “दिवाळी’ व्यावसायिकांचे दिवाळे

पिंपरी – मागील काही वर्षांपासून ऑनलाईन बाजरपेठेची उलाढाल हजारो कोटींच्या घरात पोहचली आहे. प्रत्यक्ष दुकानात जाऊन खरेदी करण्याऐवजी ग्राहक ऑनलाईन वस्तू खरेदी करत आहेत. याचा सर्वाधिक फटका इलेक्‍ट्रिक, इलेक्‍ट्रॉनिक व्यावसयिकांना बसत आहे. ऑनलाईनची झळ आता कपडा व इतर व्यावसायिकांनाही बसला आहे. Diwali” business bust by online festivals

काही व्यवसायांना तर जवळपास 70 टक्‍क्‍यांपर्यंत फटका बसत असल्याची शक्‍यता व्यापारी वर्गाने वर्तविली आहे. मोठ-मोठ्या ई-कॉमर्स साईट गेल्या काही वर्षांमध्ये दसरा-दिवाळीला हजारो कोटींचा व्यवसाय करत असतात. दसरा-दिवाळीसाठी मोठ्या प्रमाणात सूट देण्यात येत असल्याने स्थानिक व्यावसायिकांच्या विक्रीवर परिणाम होत आहे.

ई-कॉमर्स कंपन्याकडून विविध सवलतीच्या दरांमध्ये ग्राहकांना विविध प्रकारची उत्पादने घरपोच मिळत असल्याने ग्राहकांचा यांना प्रतिसादही मोठ्या प्रमाणात मिळू लागला आहे. ऑनलाईन व्यवसाय करणाऱ्या कंपन्यानी मोठ्या डील्स, फेस्टिव्हल ऑफर्सद्वारे ग्राहकांना आकर्षित केले आहे.कोणताही सण-उत्सव आला की बड्या कंपनीद्वारे फेस्टिव्हल ऑफर काढण्यात येते. आकर्षक सूट मिळत असल्याने बहुतांश ग्राहकांचा कल ऑनलाईन खरेदीकडे आहे. याचा दसऱ्याला फटका बसला असून दिवाळीच्या व्यवसायावर परिणाम होण्याची भीती व्यावसायिकांना सतावू लागली आहे.

अवर्षण, दुष्काळ, औद्योगिक मंदी याचा व्यवसायावर परिणाम होत असताना आता ऑनलाईन शॉपिंगमुळे स्थानिक व्यवसायांवर गंडातर येत आहे. त्यामुुळे, उत्पादक त्यावर चालणारे छोटे-मोठे व्यवसाय, कामगार, व्यापारी या साखळीवर मोठा परिणाम होत असल्याचा पहायला मिळत आहे. एवढेच नव्हे तर पणत्यांपासून ते लाईटच्या माळा आणि रांगोळीपर्यंत बहुतेक वस्तू ऑनलाईन मिळत असल्याने फेरीवाल्यांच्या व्यवसायावरही परिणाम होत आहे.

आमच्याकडे येणाऱ्या ग्राहकांना योग्य किंमतीमध्ये माल दिला जातो, शिवाय इतर सेवाही मोफत दिल्या जातात. असे असतानाही ग्राहकांचा ऑनलाईन खरेदीकडे कल वाढला आहे, परिणामी मागील काही दिवसात ग्राहकांची संख्या सातत्याने घटत चालली आहे. विक्रीच कमी होत असल्याने व्यवसायातील अडचणी वाढल्या आहेत.

– तुषार परमार, विक्रेते, पिंपरी

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)