नियम पाळल्याने पोलिसांकडून स्वागत
कात्रज – लॉकडाऊनच्या सर्व नियमांतर्गत सहा महिन्यांपासून रेंगाळलेला विवाह कोंढवा खुर्द येथे झाला. आई-वडिलांच्या उपस्थितीत धनकवडी येथील वर हर्षल पवार व कोंढव्यातील वधू रेश्मा ननवरे यांचा विवाह झाला. हे नवदाम्पत्य संत खेतेश्वर चौक कात्रज येथे आले असता भारती विद्यापीठ पोलिसांनी वधूसह वर आणि त्याच्या आई-वडिलांचे स्क्रीनिंग टेस्ट केले तसेच सॅनिटायझर, मास्क व हॅन्डग्लोव्हज आहेर देत दाम्पत्यास शुभेच्छा दिल्या.
यावेळी पोलीस निरीक्षक गुन्हे विष्णू ताम्हाणे, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीशैल्य चिवडशेट्टी, नगरसेवक वसंत मोरे, कुंदन शिंदे, परशुराम पिसे आदी उपस्थित होते. यावेळी येथील नगरसेवक वसंत मोरे यांनीही नवदाम्पत्याच्या स्वागतासाठी सॅनिटायझर स्प्रे केलेली फुले उधळली. या विवाहासाठी पुणे पोलीस आयुक्तालय यांचा परवाना घेण्यात आला होता.