Kolkata Airport । पश्चिम बंगालमधील कोलकाता विमानतळावर बॉम्बची धमकी मिळाल्यानंतर सर्वत्र गोंधळाचे वातावरण निर्माण झालंय. विमानतळ अधिकाऱ्यांना काल एक ईमेल मिळाला. ज्यामध्ये संकुलात वेगवेगळ्या ठिकाणी बॉम्ब ठेवण्यात आल्याचा दावा करण्यात आला होता. अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ईमेल मिळाल्यानंतर विमानतळावर शोध मोहीम सुरू करण्यात आली.
बॉम्बस्फोटाची धमकी असलेला ईमेल Kolkata Airport ।
अधिकाऱ्यांनी सांगितले की, दुपारी 12.55 वाजता बॉम्बस्फोटाची धमकी असलेला ईमेल खोटा निघाला. विमानतळाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मेलमध्ये मेल पाठवणाऱ्याच्या टीमने रामेश्वरम कॅफेमध्ये बॉम्ब ठेवला होता, मात्र कोलकाता विमानतळावर ठेवलेला बॉम्ब त्यापेक्षा मोठा आहे. मेलमध्ये असेही म्हटले आहे की, इतर चार विमानतळांवर देखील बॉम्ब ठेवण्यात आले होते आणि सर्व बॉम्ब रात्री 12.55 वाजता फुटतील. हा मेल शुक्रवारी सकाळी 11.40 च्या सुमारास कोलकाता विमानतळाच्या व्यवस्थापकाला मिळाला.
पोलीस ईमेलचा सोर्स शोधतायेत Kolkata Airport ।
बिधाननगर पोलीस आयुक्तालयाच्या विमानतळ विभागाच्या पोलीस उपायुक्त ऐश्वर्या सागर यांनी सांगितले की, ईमेल मिळाल्यानंतर नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या (एनएससीबीआयए) सुरक्षा यंत्रणांनी शोध मोहीम सुरू केली. ते म्हणाले, ‘मोठ्या प्रमाणावर शोधमोहीम राबवल्यानंतर सुरक्षा कर्मचारी या निष्कर्षापर्यंत पोहोचले की ही धमकी फसवी होती.’
अधिका-यांनी सांगितले की, विमानतळ प्राधिकरण, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (CISF) आणि विधाननगर पोलीस ईमेलचा स्त्रोत आणि पाठवणारा शोधण्यासाठी संयुक्तपणे तपास करत आहेत. सागर म्हणाले , “आम्ही ईमेलचा स्रोत शोधण्यासाठी तपास करत आहोत.” मात्र, विमानतळाला अशी धमकी मिळण्याची ही पहिलीच वेळ नाही. काही दिवसांपूर्वी दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरही अणुबॉम्बची धमकी देण्यात आली होती. रामेश्वरम कॅफेमध्ये 1 मार्च रोजी बेंगळुरू येथे स्फोट घडवून आणण्यात आला होता. त्यातील आरोपींना अटक करण्यात आली आहे.