जम्मू – जम्मू-काश्मीरमध्ये दुसऱ्या टप्प्यात शुक्रवारी जम्मू लोकसभा मतदारसंघात लोकशाहीचा मोठा उत्सव झाला. निवडणुकीत ७२.६२ टक्के मतदान झाले. त्यामुळे २२ उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएममध्ये बंद झाले. (Record voting in Jammu and Kashmir)
जम्मू, सांबा, रियासी आणि राजोरी या विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्रांवर सकाळपासूनच मतदारांच्या लांबलचक रांगा पाहायला मिळाल्या. संपूर्ण लोकसभा मतदारसंघातील २४१६ मतदान केंद्रांवर विस्तृत सुरक्षा व्यवस्था करण्यात आली होती. पाकिस्तानला लागून असलेल्या जम्मू आणि सांबा या सीमावर्ती भागातही लोकांनी मोठ्या प्रमाणात मतदान केले.
या निवडणुकीत १७.८० लाख मतदार होते, त्यासाठी १५ हजार कर्मचारी तैनात करण्यात आले होते. निवडणुकीत १० पिंक बूथ, १० अपंग, ९ युथ आणि १२ ग्रीन बुथ करण्यात आले. जम्मूतील पॉलिटेक्निक कॉलेजच्या स्ट्राँग रूममध्ये रात्री उशिरापर्यंत ईव्हीएम मशीन पोहोचवण्यासाठी गर्दी होती. कडेकोट बंदोबस्तात दुर्गम भागातून मतदान केंद्रांची वाहतूक करण्यात आली. सर्व वाहनांवर जीपीएसद्वारे नजर ठेवण्यात आली.
सकाळी ९ वाजेपर्यंत १०.३९ टक्के
सकाळी ११ वाजेपर्यंत २५.९३ टक्के
दुपारी १ वाजेपर्यंत ४२.८८ टक्के
दुपारी ३ वाजेपर्यंत ५७.७६ टक्के
सायंकाळी ५ वाजेपर्यंत ६७.२२ टक्के
मतदान संपेपर्यंत ७२.६२ टक्के