माँसाहेब आणि आदरणीय बाळासाहेब..! – सुप्रिया सुळेंनी केले भावनिक ट्विट

मुंबई – महाराष्ट्राचे २९ वे मुख्यमंत्री म्हणून तसेच ठाकरे घराण्यातील पहिला मुख्यमंत्री म्हणून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे आज शपथ घेणार आहेत. शिवसेनेच्या राजकीय कारकीर्दचा आणि जडणघडणीत साक्षीदार असलेल्या शिवाजी पार्क येथील शिवतीर्थावर उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रिपदाचा शपथविधी सोहळा होणार आहे.

दरम्यान, संध्याकाळी ६ वाजून ४० मिनिटांनी हा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. मुख्यमंत्रीपदासाठी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी उद्धव ठाकरे यांचे अभिनंदन केले आहे. तर याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी बाळासाहेबांच्या आठवणीमध्ये एक भावनिक पोस्ट केली आहे.


सुप्रिया सुळे यांनी म्हंटले कि, ”माँसाहेब आणि आदरणीय बाळासाहेब…! आज तुमची खुप आठवण येतेय. हे सर्व पहायला तुम्ही दोघे असायला हवे होतात. तुम्हा दोघांनी मला मुलीपेक्षाही जास्त प्रेम दिले. तुम्ही माझ्या आयुष्यात स्पेशल होता,आहात आणि राहाल., असे भावनिक ट्विट त्यांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.