Dattatray Bharne video । इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे यांचा शिवीगाळ केलेला व्हिडीओ समोर आला आहे. इंदापूरमधील हा व्हिडीओ असून यामध्ये दत्तात्रय भरणे यात शिवीगाळ करत असल्याचं दिसत आहे. रोहित पवार यांनी हा व्हिडिओ शेअर केलाय. ताईच त्यांच्या कोणत्याही धमक्यांना भीक घालणार नसल्याचे पवार यांनी म्हटले आहे.
आज बारामती लोकसभा मतदानाच्या पार्श्वभूमीवर भरणेंचा त्यांच्या कार्यकर्त्यांसोबत वाद झाला. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. यामध्ये भरणे,”तुम्हाला माझ्याशिवाय कुणी नाही. तो बारामती अॅग्रोचा कुणीही येणार नसल्याचं म्हणत असल्याचं या व्हिडिओत दिसतंय.
दत्तात्रय भरणे हे अजित पवारांसोबत असून बारामती लोकसभा मतदारसंघात ते सुनेत्रा पवांरासाठी प्रचार करत असल्याचं पाहायला मिळालं होतं. दत्तात्रय भरणेंचा हा व्हिडीओ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवरुन शेअर केला आहे.
केवळ दडपशाहीपुढं न झुकता स्वाभिमानाने बुथवर काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना अजितदादा मित्र मंडळाचे सदस्य, माजी मंत्री आणि इंदापूरचे आमदार हे कशा अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करतात आणि धमकी देतात ते या व्हिडिओत बघा… विशेष म्हणजे ज्यांच्याशी ते असं वागतात ही त्यांचीच भावकी आणि बारा… pic.twitter.com/5ECFw7EnCx
— Rohit Pawar (@RRPSpeaks) May 7, 2024
धमक्यांना आणि दपडशाहीला भीक घालणार नाही Dattatray Bharne video ।
त्यानंतर आमदार रोहित पवार यांनी ट्वीट केलंय की, “केवळ दडपशाहीपुढं न झुकता स्वाभिमानाने बुथवर काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना अजितदादा मित्र मंडळाचे सदस्य, माजी मंत्री आणि इंदापूरचे आमदार हे कशा अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करतात आणि धमकी देतात ते या व्हिडीओत बघा. विशेष म्हणजे, ज्यांच्याशी ते असं वागतात ही त्यांचीच भावकी आणि बारा बलुतेदारांपैकी एक आहे. ही चिडचिड खूप काही सांगून जाते. पण आजच्या लढाईत स्वाभिमानी कार्यकर्ता आणि मतदार कोणत्याही धमक्यांना आणि दपडशाहीला भीक घालणार नाही.”असे म्हटले.
भरणेंचा व्हिडीओ पाहून आश्चर्य वाटतंय Dattatray Bharne video ।
तर दुसरीकडे दत्तात्रय भरणेंच्या व्हायरल व्हिडीओबाबत सुप्रिया सुळे यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. दत्तात्रय भरणेंचा व्हिडीओ शॉकींग आहे. मला आश्चर्य वाटतंय, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत. त्यासोबतच त्यांनी भरणेंविरोधात मतदारांना धमकावण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी