….तर देवेंद्र-अजित सरकार कोसळले नसते – रामदास आठवले

मुंबई – माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या मदतीने स्थापन केलेले सरकार अवघ्या 80 तासांत कोसळले. मात्र, भाजप सरकार बनवू शकले असते, असा विश्वास केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केला आहे.

रामदास आठवले म्हणाले कि, बहुमत दर्शविल्यानंतर भाजप देखील सरकार बनवू शकते. फ्लोर टेस्टसाठी सर्वोच्च न्यायालयाने 24 तासांची मुदत दिली नसती तर देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी राजीनामा दिला नसता. 24 तासांच्या अल्पावधीत बहुमत सिद्ध करणे कठीण होते, असे मत त्यांनी मांडले आहे.

दरम्यान, फडणवीस यांनी राजीनामा दिल्यानंतर राज्यपालांनी महाविकास आघाडीला सत्तास्थापनेच आमंत्रण दिले असून या आघाडीचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांचा आज सायंकाळी शपथविधी होतो आहे. त्यांच्यासोबत कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस व शिवसेनेचे प्रत्येकी दोन मंत्री शपथ घेणार आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.