नगर -जिल्ह्यातील बनावट डीझेल बाबत पोलीस पथकाने कारवाई करुन 15 दिवसांचा कालावधी उलटला आहे. मात्र, अद्याप पर्यंत या डीझेल रॅकेटमधील मुख्य सूत्रधाराला अटक करण्यात आलेली नाही. यापूर्वीच्या नाप्ता भेसळ प्रकरणाचा तपासही अजुनपर्यंत पूर्ण झालेला नाही. याप्रकरणात राजकीय हस्तक्षेप होत असल्याची माहीती आहे. यातील मुख्य सूत्रधाराला त्वरीत अटक करण्यात यावी अशी मागणी माजी आमदार शिवाजी कर्डिले यांनी पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्याकडे केली आहे.
नगर जिल्ह्यात बनावट डीझेल व नाप्ता भेसळीचे मोठे रॅकेट कार्यरत आहे. या रॅकेटला मोठा राजकीय वरदहस्त असल्याने बलेआम बनावट डीझेल विक्री केली जात आहे. नाप्ता भेसळीचे रॅकेटही यापूर्ण जिल्ह्यात सापडलेले आहे. मात्र, याप्रकरणाचा तपास अजूनपर्यंत पूर्णत्वास गेला नाही. आता पुन्हा डीझेल भेसळीचे रॅकेट उजेडात आले आहे. डीझेल भेसळीबाबत पोलीस पथकाने कारवाइ करून 15 दिवसांचा कालावधी उलटला आहे. मात्र, अद्यापर्यंत या प्रकरणातील मुख्य सुत्रधार व इतर आरोपींना अटक करण्यात आलेली नाही.