UAE Floods। संयुक्त अरब अमिरातीमध्ये काल झालेल्या मुसळधार पावसाने दुबईचे वाळवंट जलमय झालंय. रस्ते, चौक आणि दुकाने तुडुंब भरली आहेत, त्यामुळे दुबईचे लोक खूप चिंतेत आहेत. शेजारील ओमानमध्येही पावसाने असा कहर केला की पुरात १८ जणांना जीव गमवावा लागला. पावसामुळे आलेल्या पुराचा सर्वात वाईट परिणाम दुबईच्या रस्त्यांवर झाला असून त्यामुळे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. अनेक स्थानिक रिपोर्ट्सनुसार, अरब अमिरातीमधील हवाई वाहतुकीवरही परिणाम झाला आहे.
विमानतळ, मेट्रो स्टेशन, मॉल, रस्ते, व्यापारी संस्थांमध्ये पुराचे पाणी शिरले. शाळा बंद होत्या. त्याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर गेल्या 24 तासात 160 मिमी पाऊस झाला. जे सहसा दोन वर्षांत होते. ही एक मोठी नैसर्गिक आपत्ती आहे.
दुबई विमानतळावरही पूर आला असून त्यामुळे अनेक उड्डाणे रद्द करावी लागली आहेत. याआधी सोमवारी दुबई पोलिसांनी खराब हवामानाबाबत सार्वजनिक सुरक्षा सल्लाही जारी केला होता, लोकांना खराब हवामानाबद्दल सतर्क करण्यात आले होते. UAE हवामान खात्याने अबुधाबीसह अनेक मोठ्या शहरांमध्ये पुढील २४ तास मुसळधार पाऊस आणि गारपिटीचा इशारा दिला आहे.
खराब हवामानाची नवीन लाट येऊ शकते UAE Floods।
UAE च्या नॅशनल मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंटने (NCM) म्हटले आहे की, मंगळवार दुपारपासून ते बुधवारी सकाळपर्यंत खराब हवामानाची दुसरी लाट पश्चिमेकडील भागात सुरू होऊ शकते. ही लाट अरब अमिरातीसह आसपासच्या अनेक देशांमध्ये पसरू शकते. राष्ट्रीय आपत्कालीन व्यवस्थापन समितीने सांगितले की, 14 एप्रिल ते 15 एप्रिल दरम्यान आलेल्या पुरामुळे ओमानच्या विविध भागात किमान 17 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. या काळात देशातील अनेक भागात मुसळधार पाऊस झाला असून बुधवारपर्यंत हवामान खराब राहण्याचा अंदाज आहे.
गेल्या वर्षीही पूर आला होता UAE Floods।
गतवर्षीही नोव्हेंबर महिन्यात दुबईचे हवामान खूपच खराब झाले होते, वादळी वाऱ्यासह पावसामुळे शहराची अवस्था बिकट झाली होती. प्रशासनाने लोकांना समुद्र किनाऱ्यावर जाण्यास बंदी घातली होती. वाळवंटी देशातील हवामान अचानक बिघडल्याने जगभरातील शास्त्रज्ञ चिंतेत आहेत.