गुवाहाटी – आसाम प्रदेश कॉंग्रेसने आज पासून कॉंग्रेसच्या गॅरंटी कार्डाचे घरोघरी वाटप सुरू केले आहे. काँग्रेसचे आसामचे प्रभारी सरचिटणीस जितेंद्र सिंग यांनी या कार्यक्रमाची सुरुवात केली.
पक्षाचे अनेक नेते आणि कार्यकर्त्यांनी शहरातील पंजाबारी भागात घरोघरी जाऊन या कार्ड वाटप केले.लोकसभेचे खासदार अब्दुल खलेक, गुवाहाटी मतदारसंघातील पक्षाच्या उमेदवार मीरा बर्थकूर गोस्वामी, काँग्रेस प्रवक्त्या महिमा सिंह आणि अनेक आमदार यावेळी उपस्थित होते.
या गॅरंटी कार्डात कॉंग्रेस पक्षाने मतदारांना ज्या हमी दिल्या आहेत त्याची माहिती देण्यात आली आहे. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी ३ एप्रिल रोजी नवी दिल्लीत या उपक्रमाची सुरुवात केली होती. कॉंग्रेस मतदारांना ज्या हमी देते त्याची पुर्तताही करते असे पक्षाचे ट्रॅक रेकॉर्ड आहे असे कॉंग्रेस नेत्यांनी यावेळी सांगितले.