पुणे – मुंबई – राज्यात मोठा राजकीय भूकंप झाला असून अजित पवार यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे.आज रविवारी, सकाळपासूनच राजभवनात हालचाल सुरू होती. त्यामुळे अजित पवारांनी राष्ट्रवादीत बंडखोरी करून सरकारमध्ये दाखल होण्याच्या चर्चा होत्या. आज दुपारीच काही वेळापूर्व राजभवनात शपथविधी सोहळा झाला. यावेळी अजित पवारांनी राज्याच्या उपुख्यमंत्री पदाची शपथ घेत असल्याचं जाहीर केलं. “मी अजित पवार, महाराष्ट्राच्या राज्याच्या उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतो”, असे अजित पवार म्हणाले.
दरम्यान, अजित पवार यांनी विरोधी पक्षनेताचा राजीनामा दिला त्यानंतर राजभवनावर उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. अजित पवारांकडे 25 आमदारांचा पाठिंबा असल्याचे पत्र असल्याचे म्हटले जात आहे. दरम्यान, यावेळी एकूण 9 राष्ट्रवादीचे आमदार शपथ घेणारअसल्याचं सांगितले जात आहे. तर आता राष्ट्रवादीचे दोन खासदार देखील अजित पवारांसोबत गेल्याने त्यांना देखील केंद्रात काही जबाबदारी मिळते का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. दरम्यान अजित पवार यांच्यासोबत पक्षातील अनेक आमदार असले तरी कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहित पवार त्यांच्याबरोबर नाहीत, त्यांनी दादांना चकवा दिल्याच्या चर्चा आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
संघटनेत पद देण्याची मागणी केल्यानंतर आज (2 जुलै) देवगिरी बंगल्यावर अजित पवार यांच्या नेतृत्वात समर्थक आमदार आणि राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षांची बैठक पार पडली. याच बैठकीनंतर या चर्चांना सुरुवात झाली आहे. अजित पवार यांच्या आजच्या बैठकीला आमदार हसन मुश्रीफ, दिलीप वळसे पाटील, धनंजय मुंडे, किरण लहामाटे, दौलत दरोडा, अतुल बेनके, आदिती तटकरे, संग्राम जगताप हे उपस्थित होते. दरम्यान, शरद पवार आणि रोहित पवार आत्ता पुण्यातील त्यांच्या मोदी बागेच्या निवासस्थानी आहेत दुपारी जेवण झाल्यानंतर ते माध्यमांशी संवाद साधणार आहेत.