Ajay Pratap Singh Resigns । लोकसभा निवडणुकीपूर्वी मध्य प्रदेशात भाजपला मोठा धक्का बसला आहे. राज्यसभा खासदार अजय प्रताप सिंह यांनी आज पक्षाचा राजीनामा दिला. लोकसभेचे तिकीट न मिळाल्याने सिंह नाराज होते. त्यामुळे त्यांनी पक्षाला सोडचिट्ठी दिली असल्याचे म्हटलं जातंय. अजय प्रताप सिंह आता अपक्ष म्हणून निवडणूक लढण्याची शक्यता वर्तवण्यात येतीय.
अजय प्रताप सिंह हे भाजपकडून सिद्धी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत होते. मात्र भाजपने सिद्धी लोकसभा मतदारसंघातून डॉ. राजेश मिश्रा यांना तिकीट दिले आहे. अजय सिंह 2018 मध्ये मध्य प्रदेशमधून राज्यसभेचे खासदार म्हणून निवडून आले होते.
BJP Rajya Sabha MP Ajay Pratap Singh resigns from the party. pic.twitter.com/W26tD0CA11
— ANI (@ANI) March 16, 2024
काय म्हणाले अजय सिंह ?
तिकीट न मिळाल्याने संतप्त झालेल्या राज्यसभा सदस्य अजय प्रताप सिंह यांनी कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप केला. त्यांनी आपला राजीनामा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्याकडे पाठवला आहे. राजीनामा दिल्यानंतर अजय सिंह म्हणाले की, राजकारण हे माझ्यासाठी सेवेचे माध्यम आहे, पैसे कमवण्याचे माध्यम नाही, पण आता परिस्थिती अशी झाली आहे की, भाजपमध्ये राहणे मला योग्य नाही. त्यामुळे मी आता पक्षाचा राजीनामा देत आहे.
थेट अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार
अजय प्रताप सिंह आता थेट अपक्ष म्हणून लोकसभेची जागा लढवू शकतात. अजय प्रताप सिंह यांचा राजीनामा हा भाजपसाठी मोठा धक्का मानला जात आहे.
संघाशी निगडीत अजय प्रताप सिंह म्हणाले, “माझा जातीच्या राजकारणावर विश्वास नाही, पण लोकशाहीत सर्व जातींचा सहभाग असायला हवा. माझा त्यावर विश्वास आहे. सर्व पक्षांनीही याची पुरेपूर काळजी घेतली पाहिजे.” त्यांना कशाचा राग आहे, असे विचारले असता ते म्हणाले की, अनेक मुद्दे आहेत. बर्याच काळापासून गोष्टी चालू आहेत. प्रश्नांची उत्तरे उपलब्ध नाहीत.
हेही वाचा
congress-sp | कॉंग्रेस आणि सपमध्ये मध्यप्रदेशसाठीही समझोता