Sara Ali Khan and Rinku Rajguru| अभिनेत्री सारा अली खानने नुकतेच झी चित्रगौरव पुरस्कार सोहळ्याला हजेरी लावली होती. यावेळी तिने प्रेक्षकांसोबत मराठीत संवाद साधला. तसेच मराठी गाण्यावर देखील ठेका धरला. ‘ऐका दाजिबा…’ या गाण्यासह तिच्या सिनेमातील काही गाण्यांवर डान्स करताना दिसेल.
बॉलीवूडच्या आघाडीच्या अभिनेत्रीने या कार्यक्रमाला हजेरी लावल्याने हा सोहळा अधिक रंजक झाला. यानंतर आता साराची एक मुलाखत चर्चेत आली आहे. यात तिने मराठमोळी अभिनेत्री रिंकू राजगुरुचे कौतुक केले आहे.
एका मुलाखतीत साराला विचारण्यात आलं होतं की, तिनं कोणता मराठी चित्रपट पाहिलाय का? त्यावर सारा म्हणाली, “मराठी चित्रपटांपैकी ‘सैराट’ चित्रपट मी पाहिला आहे आणि नुकताच तो मी पुन्हा पाहिला होता. या चित्रपटातलं रिंकूचं काम मला खूप आवडलं होतं.” सैराट फेम रिंकू राजगुरूनेही साराची ही प्रतिक्रिया तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर करत आनंद व्यक्त केला.
रिंकूला या सिनेमातून तुफान लोकप्रियता मिळाली होती. २०१६ साली आलेल्या या सिनेमात तिने ‘आर्ची’ आणि अभिनेता आकाश ठोसरने ‘परशा’ ही भूमिका साकारली होती. आर्ची-परशा या जोडीने अवघ्या महाराष्ट्राला वेड लावले होते. बॉक्स ऑफिसवर सर्वाधिक कमाई ‘सैराट’ हा मराठी चित्रपट ठरला. करण जोहरने या सिनेमाचा बॉलिवूड रिमेकही प्रदर्शित केला होता. ज्यात अभिनेत्री जान्हवी कपूर मुख्यभूमिकेत झळकली होती. Sara Ali Khan and Rinku Rajguru|
दरम्यान, सारा अली खान लवकरच ‘ऐ वतन मेरे वतन’ चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट १९४२ मधील भारताच्या स्वातंत्र्यसंग्रामातील उषा मेहता यांच्या जीवनावर आधारित आहे. यात सारासह अभिनेता सचिन खेडेकर महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. २१ मार्च २०२४ रोजी अॅमेझॉन प्राइम व्हिडीओवर प्रदर्शित होणार आहे. Sara Ali Khan and Rinku Rajguru|
हेही वाचा:
खुशी कपूर इब्राहिम अली खानचा ‘नादानियां’ चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात