Pune: पुण्यातील कात्रज भागात एक धक्कादायक घटना घडली आहे. पतीनेच पत्नी आणि सोळा वर्षाच्या मुलीचा गळा दाबून खून केला. यानंतर पती स्वत: पोलीस ठाण्यात हजर झाला. शनिवारी दुपारी कात्रज- दत्तनगर परिसरातील लेक विस्टा सोसायटीमध्ये ही घटना घडली आहे.
याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी पतीला ताब्यात घेतले आहे. तसेच घटनास्थळी भारती विद्यापीठ पोलिसांचे पथक दाखल झाले असून महिला आणि तिच्या मुलीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्याचे काम सुरु आहे.
श्वेता तळेवाले (वय ४०), शिरोली तळेवाले (वय १६) अशी खून झालेल्या दोघांची नावे आहेत. तर अजय तळेवाले (वय ४५) असे खून करणाऱ्या आरोपीचे नाव आहे. भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. दरम्यान, मृत पत्नी आणि आरोपी पती यांचा प्रेमविवाह होता. मात्र त्या दोघांचे मागील काही दिवसांपासून घरगुती वाद सुरु होते.