पिंपरी : पिंपरी चिंचवड शहरातील तीन करोनाबाधित रुग्ण ठणठणीत बरे झाले आहेत. त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. आता आणखी पाच रुग्णांचे अहवाल आज सकाळी निगेटिव्ह आले आहेत.
शुक्रवारी पाच जणांचे उपचारानंतरचे घशातील द्राव तपासणीसाठी एनआयव्ही कडे पाठवण्यात आले होते. त्याचा तपासणी अहवाल आज सकाळी निगेटिव्ह आला. आता दुसऱ्यांदा तपासणीसाठी त्यांचे घशातील द्राव एनआयव्ही कडे पाठवले जाणार आहेत. हे अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर ते तिघे करोनामुक्त झाल्याचे स्पष्ट होईल. त्यानंतर त्यांना घरी सोडण्यात येणार आहे. या पाच जणांमध्ये थायलंडहून आलेल्या एका व्यक्तीचाही समावेश आहे.
पिंपरी चिंचवड शहरात 12 ते 20 मार्च या कालावधीत सातत्याने रुग्णसंख्या वाढत होती . त्यामुळे संपूर्ण राज्याचे लक्ष शहराकडे लागले होते. आता रुग्ण बरे होत असल्याने तसेच नवीन पॉझिटिव्ह रुग्ण नसल्याने दिलासा मिळाला आहे.