देहूरोड – देहूरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन वेगवेगळ्या ठिकाणी गळफास घेऊन आत्महत्या घडल्याची घटना गुरुवारी (दि. 26) उघडकीस आली आहे.
दादाजी नानाजी सूर्यवंशी (वय 49, रा. राठी ऐकता चौक, रुपीनगर, स्वामी समर्थ हौसिंग सोसायटी) असे गळफास घेतलेल्या युवकाचे नाव आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दादाजी हा रिक्षाचालक असून, त्याला दारूचे व्यसन होते. गुरुवारी दुपारी अडीचच्या सुमारास तो घराबाहेर पडला होता दुपारी चारच्या सुमारास रुपीनगरजवळ निगडी येथील डिफेन्सच्या मैदानात झाडाला गळफास घेतल्याची माहिती मिळाली. त्याचा मुलगा अक्षय दादाजी सूर्यवंशीला कळवित माहिती घेतली असता त्याने वडिलांना दारूचे व्यसन असल्याचे सांगितले. मात्र, करोनामुळे व्यवसाय बंद झाल्याने उदरनिर्वाह करण्याला त्रास झाल्याने आत्महत्या केल्याची पोस्ट व्हायरल होत असल्याचे चुकीची असून, त्याच्या मुलाने करोनाविषयी काहीही सांगत नसून व्हायरल होत असलेला मेसेज सारखी घरची परिस्थिती नसल्याचेही पोलिसांनी सांगितले.
गणेश आढेराव देवरे (वय 30, रा. विठ्ठलवाडी, देहूगाव) असे गळफास घेतलेल्याचे नाव आहे. राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी दुपारी अकराच्या सुमारास घडली. आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही. याप्रकरणी अधिक तपास पोलीस करीत आहेत.