Praniti Shinde – कोव्हिड-१९ लस लोकांचे आयुष्य कमी करण्यासाठीच होती की काय? अशी शंका वाटते. कारण ही मात्रा घेतलेल्या असंख्य लोकांना नंतर मधुमेह, रक्तदाब, हृदयविकार व अन्य दुखणे सुरू झाले आहेत. त्याचा सार्वत्रिक अनुभव समोर येत असल्याचा दावा काँग्रेस आमदार तथा सोलापूर लोकसभा इच्छुक प्रणिती शिंदे यांनी केला आहे.
सरकारने व्हॅक्सिन खरेदी केले होते त्यामुळे त्यांनी लोकांना जबरदस्ती केली, असा दावाही शिंदे यांनी केला आहे. शनिवारी दक्षिण सोलापूर तालुक्यातील विविध गावांना आमदार प्रणिती शिंदेनी भेट देत लोकांशी संवाद साधला.
याच दरम्यान इलेकट्रोल बॉण्डच्या मुद्यावरून पंतप्रधान मोदीवर टीका करताना आमदार शिंदेंनी व्हॅक्सीन संदर्भात धक्कादायक विधान केले आहे. ( covid vaccine | Praniti Shinde । PM Modi )
शिंदे पुढे म्हणाल्या की, तुमच्या आयुष्यावर पैसे कमवण्यासाठी मोदी सरकारने व्हॅक्सिन विकत घेतले. तुम्हाला लस देण्यासाठी जबरदस्ती केली. ज्यांना काहीच नव्हते अशांना देखील काही ना काही आजार सुरु झाले.
मी तर व्हॅक्सिन घेतलेच नाही. मोदींचा फोटो असताना मी कशासाठी व्हॅक्सिन घेऊ? आपला एकमेव देश आहे जिथे व्हॅक्सिन सर्टिफिकेटवर मोदींचे फोटो होते, असेही त्या म्हणाल्या. ( covid vaccine | Praniti Shinde । PM Modi )