मुंबई : राज्यातील राजकीय घडामोडी नंतर आणि नव्या सरकारची सत्ता स्थापन झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्यांदाच दिल्लीत गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली आहे. यावरून आता शिवसेना नेत्या आणि माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी पुन्हा एकदा बंडखोर आमदार आणि भाजपावर जोरदार निशाणा साधला आहे.
किशोरी पेडणेकर म्हणाल्या,’महाराष्ट्राची परंपरा दिल्लीसमोर न झुकण्याची आहे. आज मात्र मुख्यमंत्र्यांना दिल्लीच्या वाऱ्या कराव्या लागत असल्याचे म्हणत पेडणेकरांनी एकनाथ शिंदे यांना टोला लगावला आहे. त्या पुढे म्हणाल्या,’ फडणवीसांच्या पत्नी म्हणाल्या होत्या की फडणवीस वेशांतर करून आमदारांना भेटायला जायाचे. त्यामुळे हे काही आत्ता लगेच घडलेले नसून दिड वर्षापासून हे षडयंत्र चालूच होते. त्यामुळे हे सर्व गेले आहेत. आता जे शिवसैनिक उरले आहेत, त्यांना घेऊन पुन्हा शिवसेना उभी करू असे पेडणेकर यांनी म्हटले आहे.’