अभिनेत्री मोनालिसाने पिवळ्या रंगाची फारिको ब्रँडची साडी आणि डीप नेक कट स्लीव्ह ब्लाउजमध्ये पारंपारिक लुकमध्ये अप्रतीम दिसत आहे.
फोटोमध्ये अभिनेत्री खूपच सुंदर दिसत आहे. चाहते तिच्या स्टाइलचे खूप कौतुक करत आहेत. विशेष म्हणजे हिंदी, तमिळ, तेलगू, कन्नड अशा विविध भाषेतील कमेंट फोटोखाली दिसून येताहेत.
ऐन पावसाळ्यातला मोनालिसाच्या या इंस्टाग्रामवर कमेंटचा पाऊस पडत आहे.कोणी तिला गोल्डन परी म्हणतंय तर कोणी तिला मॅरेज मटेरियल म्हणून कमेंट करतय.
साडीशी जुळणारे मोठे कानातले आणि मोकळे केस यामुळे तिचा लूक अधिक आकर्षक वाटत आहे.
या अभिनेत्रींच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, टीव्ही आणि भोजपुरी व्यतिरिक्त, अभिनेत्रीने हिंदी, तमिळ, तेलगू, कन्नड आणि कोरिया सारख्या अनेक भाषांमध्ये देखील काम केले आहे. आता मोनालिसाही लवकरच बॉलीवूडमध्ये देखील झळकणार असल्याची चर्चा आहे. बॉलिवूड सेलिब्रिटींच्या पार्ट्यांमध्येही ती दिसते.