व्हिडिओ समोर आल्यानंतर राघवन यांचा राजीनामा
नवी दिल्ली : तामिळनाडूमधील भाजपाचे सचिव आणि राज्यातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित प्रमुख नेत्यांपैकी एक के. टी राघवन यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. राघवन यांनी युट्यूबवर एक व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर राजीनामा दिला असल्याचे सांगण्यात येत आहे.
राघवन यांनी महिलांसोबत चुकीच्या पद्धतीने वर्तन केल्याचं या व्हिडीओमध्ये दिसत असून हा व्हिडीओ भाजपाच्या सदस्यांनीच जारी केला होता. पक्षाच्या महिला कार्यकर्त्यांबरोबर शर्टलेस होऊन व्हिडीओ चॅट करताना दिसत आहे.
मदन रविचंद्रन यांनी मंगळवारी सकाळी हा व्हिडिओ अपलोड केला आहे असून राघवन यांचे असे जवळपास १५ व्हिडिओ त्यांच्याकडे असल्याचं म्हटलंय. तसेच प्रदेशाध्यक्ष के अन्नामलई यांच्या सल्लामसलत करून हा व्हिडिओ रिलीज करण्याचा निर्णय घेतला. पीडितेला न्याय मिळवून देण्यास व्हिडिओ रिलीज करण्यास अन्नामलई यांनी सांगितल्याचा दावा रविचंद्रन यांनी केला आहे.
व्हिडिओ समोर आल्यानंतर लगेच राघवन यांनी राजीनामा दिला आहे. “मी गेल्या तीन दशकांपासून पक्षासाठी निस्वार्थपणे काम करतोय. हा व्हिडिओ माझी आणि पक्षाची प्रतीमा मलिन करण्यासाठी व्हायरल करण्यात आला आहे,” असे म्हणत राघवन यांनी त्यांच्यावर लावण्यात आलेले सर्व आरोप फेटाळले आहेत.
दरम्यान, अन्नामलई यांनी सांगितले की, “या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी पक्षांतर्गत समिती नेमण्यात आली आहे. तसेच व्हिडिओ खरा आहे की नाही, याचा तपास देखील सुरू आहे.” रविचंद्रन यांनी अन्नामलईंच्या परवानगीने व्हिडिओ रिलीज केल्याचे म्हटले
यावर देखील त्यांनी प्रतिक्रिया दिली. “मी त्यांना व्हिडिओ रिलीज करण्यास सांगितलं. मात्र, व्हिडिओची विश्वासार्हता तपासण्यापूर्वी पक्षाकडून राघवन यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यात येऊ नये आणि कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येऊ नये,” असे म्हटले होते.