मुंबई : राज्यात अतिवृष्टीने सर्वत्र हाहाकार माजवला. चिपळूण, महाडला पुराने वेढले असून, त्यात शेकडो नागरिक अडकले आहेत. कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्रातील नद्यांनीही धोक्याची पातळी ओलांडल्याने अनेक भागांत पूरस्थिती निर्माण झाली. एकीकडे कोकणवर आस्मानी संकट आलेले असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय महिला अध्यक्षांनी पोस्ट केलेल्या फोटोमुळे संताप व्यक्त केला जात आहे.
आज ईद निमित्त शुभेच्छा देण्यासाठी व स्नेहभोजनासाठी निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेस चे राष्ट्रीय अध्यक्ष मा शरदचंद्र पवार साहेब,मा श्रीनिवास पाटील साहेब, मा प्रफुल्ल पटेल साहेब, मा वंदनाताई चव्हाण, मा सुप्रिया ताई सुळे आपण सर्व उपस्थित राहिलात …. आपले शतशः आभार 💐💐💐💐 pic.twitter.com/HXOhQgbt7b
— Fauzia Khan (@DrFauziaKhanNCP) July 22, 2021
राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय महिला अध्यक्ष असणाऱ्या फौजीया खान यांनी ईदनिमित्त आपल्या घरी स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित केलेला. या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद वापर, खासदार श्रीनिवास पाटील, माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल, वंदना चव्हाण आणि खासदार सुप्रिया सुळे उपस्थित होते. या सर्वांसोबतचा फोटो काल सायंकाळी साडेसहाच्या सुमारास फौजीया यांनी ट्विट केला.
कोकण बुडत असताना राज्यकर्ते मात्र पार्ट्या झोडत होते… !
संवेदनशीलपणाचा कळस ! #MahaNapasAghadi pic.twitter.com/JK7vjUm4xT
— BJP Mumbai (@BJP4Mumbai) July 22, 2021
भाजपानेही यासंदर्भात ट्विटवरुन टीका केली . फौजीया यांनी केलेल्या ट्विटचा स्क्रीनशॉर्ट शेअर करत मुंबई भाजपाने राष्ट्रवादीच्या नेत्यांना टोला लगावला आहे. “कोकण बुडत असताना राज्यकर्ते मात्र पार्ट्या झोडत होते… संवेदनशीलपणाचा कळस,” अशा कॅप्शनसहीत मुंबई भाजपाने हा फोटो शेअर केला आहे. दरम्यान, राष्ट्रवादीच्या या फोटोवर सोशल मीडियावर देखील संताप व्यक्त करण्यात येत आहे.
लाजा वाटल्या पाहिजेत ह्यांना अर्धा महाराष्ट्र पाण्यात असताना हे पार्ट्यांमधे व्यस्त आहेत. थोड्यातरी संवेदना आहेत की नाही. की फक्त सत्तेसाठी पावसात भिजायच आणी निवडून आले की जनतेला पाण्यात सोडायच…….
— ॲड. अजय दत्तात्रय घोलप 🇮🇳 (@ajay381991) July 22, 2021
महाराष्ट्र पुरात बुडतोय आणि इथे तुम्ही मेजवान्या झोडताय… कसले असंवेदनशील लोकं आहात तुम्ही. ते पण निसर्गाची धूळधाण करून बिचाऱ्या बकऱ्या मारून
— Vikar Joseph (@bharat15000) July 22, 2021
इकडे कोकण पाण्याखाली गेला आहे हे जेवणाच्या मेजवान्या करत आहे …कास जमत हो तुम्हाला….
— प्रणय कुळे.. (@Pranay75007865) July 22, 2021