“कोकण बुडत असताना राज्यकर्ते मात्र पार्ट्या झोडत होते…”; राष्ट्रवादीच्या नेत्यांचा ईदच्या पार्टीचा फोटो व्हायरल

मुंबई : राज्यात अतिवृष्टीने सर्वत्र हाहाकार माजवला. चिपळूण, महाडला पुराने वेढले असून, त्यात शेकडो नागरिक अडकले आहेत.  कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्रातील नद्यांनीही धोक्याची पातळी ओलांडल्याने अनेक भागांत पूरस्थिती निर्माण झाली.  एकीकडे कोकणवर आस्मानी संकट आलेले असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय महिला अध्यक्षांनी पोस्ट केलेल्या फोटोमुळे संताप व्यक्त केला जात आहे.

राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय महिला अध्यक्ष असणाऱ्या फौजीया खान यांनी ईदनिमित्त आपल्या घरी स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित केलेला. या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद वापर, खासदार श्रीनिवास पाटील, माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल, वंदना चव्हाण आणि खासदार सुप्रिया सुळे उपस्थित होते. या सर्वांसोबतचा फोटो काल सायंकाळी साडेसहाच्या सुमारास फौजीया यांनी ट्विट केला.

भाजपानेही यासंदर्भात ट्विटवरुन टीका केली . फौजीया यांनी केलेल्या ट्विटचा स्क्रीनशॉर्ट शेअर करत मुंबई भाजपाने राष्ट्रवादीच्या नेत्यांना टोला लगावला आहे. “कोकण बुडत असताना राज्यकर्ते मात्र पार्ट्या झोडत होते… संवेदनशीलपणाचा कळस,” अशा कॅप्शनसहीत मुंबई भाजपाने हा फोटो शेअर केला आहे. दरम्यान, राष्ट्रवादीच्या या फोटोवर सोशल मीडियावर देखील संताप व्यक्त करण्यात येत आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.