‘कुटुंब संभाळता आलं नाही, महाराष्ट्र काय संभाळणार?’ पंतप्रधान मोदींच्या टीकेला शरद पवारांच सडेतोड प्रत्युत्तर

Lok Sabha Election 2024 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत शरद पवार यांच्यावर टीका केली या वयात कुटुंबाला संभाळू शकत नाही. ते महाराष्ट्राला काय सांभाळणार? असा सवालही मोदींनी यावेळी उपस्थित केला. यावर आता खुद्द शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे
शरद पवार म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक आश्वासन दिली, पण कृतीत आणली नाहीत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2014 साली जनतेसमोर अनेक गोष्टी मांडल्या. मनमोहन सिंग यांच्यावर टिका, टिप्पणी केली. पण आज तेच निर्णय राबवण्याचा प्रयत्न करत आहेत. लोकांना हा विरोधाभास दिसतोय. लोकांमध्ये त्यांच्याबद्दल नाराजी आहे” असं शरद पवार म्हणाले
‘पंतप्रधान मोदी त्यांच्या आणि मनमोहन सिंग यांच्या 10 वर्षांच्या कार्यकाळाची तुलना करतात. पण मनमोहन सिंग यांची एक खासियत होती, ते शांतपणे काम करायचे आणि कोणताही गाजावाजा न करता देशाला निकाल द्यायचे. पीएम मोदींवर निशाणा साधत शरद पवार पुढे म्हणाले की, पीएम मोदींच्या कामाचे परिणाम मला माहीत नाहीत, मात्र त्यांच्यावर चर्चा करण्यात, टिप्पणी करण्यात आणि टीका करण्यात बराच वेळ जातो. मोदींच्या रिझल्टबद्दल माहिती नाही, पण त्यांचा चर्चा, भाष्य, टिका टिप्पणी यामध्ये फारवेळ जातो. लोकांच्या लक्षात येतय हे काही खरं नाही” असं शरद पवार म्हणाले.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी मुलाखत म्हणाले होते की…
‘शरद राव यांच्याबाबत बोलायचं म्हणजे ही राजकीय समस्या नाही. त्यांनी हा कितीही राजकीय मुद्दा बनवला तरी महाराष्ट्रातील जनतेला कसं पटेल. हा त्यांचा कौटुंबीक प्रॉब्लेम आहे. घरातील झगडा आहे. वारसा काम करणाऱ्या मुलाला द्यायचा की मुलगी आहे तर मुलीला द्यायचा. झगडा त्याचा आहे. सिंपथीऐवजी संतापाचं वातावरण आहे की या वयात कुटुंबाला संभाळू शकत नाही. ते महाराष्ट्राला काय सांभाळणार? असा सवालही मोदींनी यावेळी उपस्थित केलाय’
हे वाचले का ? ‘घर अन् कार नाही…देशभरात 18 गुन्हे दाखल’ जाणून घ्या राहुल गांधींची एकूण ‘संपत्ती’





