Himanta Biswa Sarma On Rahul Gandhi| “पाकिस्तानात निवडणुका झाल्या तर काँग्रेसचे नेते राहुल गांधी जिंकतील पण भारतात फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदीच जिंकतील. राहुल गांधी पाकिस्तानमध्ये खूप लोकप्रिय आहेत. आम्ही पाकिस्तानमध्ये राहुल गांधींशी स्पर्धा करू शकत नाही,” असा टोला आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सरमा यांनी राहुल गांधी यांना लगावला आहे. दरम्यान, पाकिस्तानचे माजी मंत्री चौधरी फवाद हुसैन यांनी काँग्रेस नेता राहुल गांधी यांचे कौतुक केले होते. त्यावरून भाजपने काँग्रेसवर निशाणा साधला आहे.
“पाकिस्तानमध्ये राहुल गांधी सर्वाधिक लोकप्रिय आहेत. पाकिस्तानमध्ये जर निवडणुका झाल्या. तिथे राहुल गांधी उमेदवार म्हणून उभे राहिले, तर ते बहुमताने तिथून निवडून येतील. पाकिस्तानमध्ये राहुल गांधीविरोधात आम्ही जिंकू शकत नाही. पाकिस्तानमध्ये राहुल गांधी यांचा नक्की विजय होतील. ते भारतात नाही तर पाकिस्तानमध्ये नक्कीच निवडून येऊ शकतात. भारतात तर केवळ नरेंद्र मोदी पंतप्रधानपदी असतील,” असे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सरमा यांनी सांगितले.
चौधरी फवाद हुसैन काय म्हणाले होते ? Himanta Biswa Sarma On Rahul Gandhi|
पाकिस्तानचे पूर्वमंत्री चौधरी फवाद हुसैन यांनी त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर राहुल गांधी यांचे कौतुक केले होते. त्यांनी यासंबंधीचा एक व्हिडिओ शेअर करत त्यांनी “राहुल गांधी ऑन फायर” असे कॅप्शनमध्ये लिहिले होते.
हेही वाचा:
‘हिंदू हृदयसम्राट’ अशी प्रतिमा निर्माण करण्याचा पंतप्रधान मोदींचा प्रयत्न – शशी थरूर