IPL 2024, RCB vs GT । Royal Challengers Bengaluru Vs Gujarat Titans : IPL 2024 च्या 52 व्या सामन्यात आज रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि गुजरात टायटन्स आमनेसामने आहेत. बऱ्याच दिवसांनंतर, बेंगळुरू आपल्या घरच्या मैदानावर, एम चिन्नास्वामी स्टेडियमवर परतला आहे.
रॉयल चॅलेंजर्स बंगलोरला 4 पैकी 3 सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. सलग 6 पराभवानंतर संघ आता 2 सामने जिंकून फॉर्ममध्ये परतला आहे, ही या संघासाठी दिलासादायक बाब आहे.
त्यांच्या शेवटच्या सामन्यात त्यांनी गुजरातचाच पराभव केला होता आणि शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील या संघाला त्या पराभवाचा बदला घ्यायचा आहे. प्लेऑफच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी गुजरातला आज कोणत्याही परिस्थितीत विजयाची नोंद करणे आवश्यक आहे.
आरसीबीच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागला. फाफ डु प्लेसीसने बॉलिंगचा निर्णय घेत गुजरातला बॅटिंगसाठी भाग पाडलं आहे. सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे.
आरसीबीचे प्लेइंग इलेव्हन ( Royal Challengers Bengaluru ) – विराट कोहली, फाफ डू प्लेसिस (कर्णधार), विल जॅक, ग्लेन मॅक्सवेल, कॅमेरॉन ग्रीन, दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), कर्ण शर्मा, स्वप्नील सिंग, मोहम्मद सिराज, यश दयाल, विजयकुमार वैशाख.
गुजरात टायटन्सची प्लेइंग इलेव्हन ( Gujarat Titans ) – वृद्धिमान साहा (यष्टीरक्षक), शुभमन गिल (कर्णधार), साई सुदर्शन, डेव्हिड मिलर, शाहरुख खान, राहुल तेवतिया, रशीद खान, मानव सुथार, नूर अहमद, मोहित शर्मा आणि जोशुआ लिटल.