कोलकाता – पश्चिम बंगालचे राज्यपाल सीव्ही आनंदा बोस यांच्यावर राजभवनातील एका महिला कर्मचाऱ्याने केलेल्या लैंगिक शोषणाच्या आरोपाची चौकशी करण्यासाठी कोलकाता पोलिसांनी एक स्वतंत्र चौकशी पथक स्थापन केले आहे, अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने शनिवारी दिली. (Raj Bhavan employee accuses West Bengal Governor of sexual harassment)
तपासाचा एक भाग म्हणून हे पथक पुढील काही दिवसात साक्षीदारांशी बोलेल. राजभवनाला सीसीटीव्ही फुटेज शेअर करण्याचीही विनंती करण्यात आली आहे, असे या अधिकाऱ्याने सांगितले. घटनेच्या कलम ३६१ अन्वये राज्यपालांच्या कार्यकाळात त्याच्यावर फौजदारी कारवाई करता येत नाही.
राज्यपालांना संवैधानिक संरक्षण असूनही पोलिस तपास कसा सुरू करू शकतात असे विचारले असता, एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, विशेषत: एखाद्या महिलेकडून कोणतीही तक्रार आल्यानंतर त्याचा तपास सुरू करणे ही नेहमीची पद्धत आहे. आणि गरज भासल्यास आम्ही घटनास्थळाला (राजभवन) भेट देऊ शकतो,असे त्यांनी पीटीआयला सांगितले.
राजभवनाच्या एका कंत्राटी महिला कर्मचाऱ्याने शुक्रवारी कोलकाता पोलिसांकडे पश्चिम बंगालच्या राज्यपालांवर राजभवनात दोनदा लैंगिक शोषण केल्याचा आरोप करत लेखी तक्रार दाखल केली.दरम्यान राजभवनात पोलिसांना बंदी करण्याचा आदेश राजभवनातील अधिकाऱ्यांनी जारी केला आहे.