मुंबई – विधानपरिषदेच्या पुणे विभाग शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघातील पाच जागांवर महाविकास आघाडीने विजय मिळवला आहे. पुणे पदवीधर मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार अरुण लाड यांचा दणदणीत विजय झाला आहे. तर बालेकिल्ला समजला जाणारा नागपूर पदवीधर मतदारसंघातही भाजपाला धक्का बसला आहे.
Maharashtra: Maha Vikas Aghadi candidate Arun Lad wins Pune graduate constituency seat in State Legislative Council elections, defeats NDA candidate Sangram Deshmukh by over 48,800 votes.
— ANI (@ANI) December 4, 2020
पुणे पदवीधर मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार अरुण लाड यांनी भाजप उमेदवार संग्राम देशमुख यांचा ८ हजार ८२४ हजारांच्या मताने पराभव केला आहे. महाविकास आघाडीचे अरुण लाड यांना एकूण १ लाख २२ हजार १४५ मते मिळाली तर भाजपचे संग्राम देशमुख यांना ७३ हजार ३२१ मते मिळाली आहेत. पुण्यात महाविकास आघाडी विरुद्ध भाजप असा पहिल्यांदाच थेट सामना या निवडणुकीत रंगला होता. त्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील या दोन्ही पाटलांसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली होती.
तर, नागपूर पदवीधर मतदारसंघातही भाजपाला धक्का बसला आहे. पहिल्या पाचही फेरीमध्ये भाजपाच्या पीछेहाट झाली असून महाविकास आघाडीने जोरदार मुसंडी मारली आहे. नागपूर मतदार संघात अभिजित वंजारी यांचा विजय झाला आहे. औरंगाबाद पदवीधर मतदारसंघातून सलग दोन वेळा विजयी ठरलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सतीश चव्हाण यांनी विजयाची हॅटट्रिक साधली आहे.