स्मार्ट सिटी रॅंकींगमध्ये उद्योगनगरी दुसऱ्या स्थानी

पिंपरी – स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या राज्यस्तरीय यादीमध्ये पिंपरी-चिंचवड शहराने चौथ्या क्रमांकावरुन दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतली आहे. स्मार्ट सिटीत तिसऱ्या टप्प्यात सहभागी होऊनही शहराचे रॅंकिंग वाढत आहे. याबाबतची माहिती स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी, महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिली.

राज्य सरकारच्या नगरविकास विभागाने स्मार्टसिटीची राज्यस्तरीय यादी जाहीर केली आहे. या योजनेअंतर्गत पूर्ण झालेल्या प्रकल्पांची संख्या, चालू प्रकल्प, निविदा टप्प्यातील प्रकल्प, डीपीआर टप्प्यातील प्रकल्प आणि वापरलेल्या निधीची रक्कम याच्या आधारे ही रॅंकींग देण्यात आली.

स्मार्ट सिटीअंतर्गत कामांसाठी साडेतीनशे कोटीच्या आसपास खर्च झाला आहे. सर्व कामे चालू आहेत. त्यामुळे खर्च होत आहे. उर्वरित शहरांचा दुसऱ्या टप्यात स्मार्ट सिटीत समावेश झाला. पिंपरी-चिंचवडचा तिस-या टप्प्यात समावेश झाला होता. सर्वात शेवटी सहभागी होऊन सर्व निविदा प्रक्रिया पूर्ण केली. विकासकामांच्या वर्कऑर्डर दिल्या आहेत. फिल्डवर कामे सुरु आहेत. त्यामुळे प्रकल्प पर्ण होतील, त्यानुसार शहराचे रॅंकींग वाढत जाणार आहे.

पिंपरी – चिंचवड स्मार्ट सिटी कॉर्पोरेशनच्या देखरेखीखाली शहरात विविध प्रकल्पांची कामे सुरु आहेत. करोना काळातही शहरात स्मार्ट सिटीची कामे चालू होती. प्रकल्पांच्या अंमलबजावणीला गती देण्यासाठी प्रशासनाने प्रयत्न केले. त्यामुळे राज्यातील नऊ शहरात पिंपरी-चिंचवडने दुसऱ्या क्रमाकांवर झेप घेतली असून ही सुधारणा शहराला चालणा देणारी आहे.

स्मार्ट सिटी अंतर्गत झालेले काम आणि खर्च यानुसार रॅंकींग काढले आहे. शहरातील सर्व कामांच्या निविदा झाल्या आहेत. कामे सुरु आहेत. त्यामुळे शहराचा रॅंकींगमध्ये नंबर वाढत आहे. राज्यातील नऊ शहरांमध्ये पिंपरी-चिंचवड दुसऱ्या क्रमांकावर आहे.
– श्रावण हर्डीकर, मनपा आयुक्‍त तथा सीईओ स्मार्ट सिटी

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.