सातारा -जिल्ह्यातील रुग्णालये, कोरोना केअर सेंटर व डीसीएचसीमध्ये उपचार घेऊन करोनातून बरे झालेल्या 179 नागरिकांना शुक्रवारी घरी सोडण्यात आले. त्याचबरोबर 409 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
सातारा येथील क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयातील 12, कराड उपजिल्हा रुग्णालयातील 17, फलटण उपजिल्हा रुग्णालयातील आठ, कोरेगावातील 16, वाईतील 12, खंडाळ्यातील 17, रायगावमधील 29, पानमळेवाडीतील 66, महाबळेश्वर येथील 12, पाटणमधील 30, दहिवडीतील नऊ, खावलीतील 71, तळमावलेतील 15, म्हसवडमधील 20, तरडगाव येथील 23 व कराडच्या कृष्णा मेडिकल कॉलेजमधील 52, अशा एकूण 409 नागरिकांच्या घशातील स्रावांचे नमुने तपासणीला पाठविण्यात आले आहेत.
करोनाची सद्य स्थिती
घेतलेले एकूण नमुने – 253096
एकूण बाधित – 51659
घरी सोडण्यात आलेले – 49334
मृत्यू – 1726
उपचारार्थ रुग्ण – 599