पुणे – मागील काही दिवसांपासून शहरात उकाडा वाढत होता. मात्र, शुक्रवारी तापमानात घट झाल्याचे चित्र आहे. परिणामी थंडीत काही अंशी वाढ झाली आहे. परंतु, शुक्रवारी दुपारी ऊन आणि सायंकाळी वातावरणात गारवा होता.
बंगालच्या उपसागरातील वादळाच्या प्रभावामुळे मागील दोन दिवस ढगाळ वातावरण होते. तर तापमानातदेखील वाढ झाली होती. मात्र, शुक्रवारी तापमानात घट झाली आहे.
तर पुढील आठवडाभर साधारणपणे 12 ते 13 अंश सेल्सिअल किमान तापमान राहणार असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली.
दरम्यान, शुक्रवारी पुण्यात 30.2 अंश सेल्सिअस कमाल तापमान आणि 11.9 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. तर, लोहगाव येथे 30.2 अंश सेल्सिअस कमाल तापमान आणि 14.3 किमान तापमान नोंदविले.