कोल्हापूर – कोल्हापुरातील महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील उमेदवार धैर्यशील माने यांच्या प्रचारार्थ उद्या (27 एप्रिल) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा कोल्हापूरमध्ये आयोजित करण्यात आली आहे. कोल्हापुरातील तपोवन मैदानात उद्या सायंकाळी साडेचार वाजता ही सभा होणार आहे. या सभेसाठी महायुतीच्या नेत्यांकडून जोरदार तयारी सुरु आहे.
या सर्व पार्श्वभूमीवर कोल्हापूर महापालिकेकडून पंतप्रधान येणाऱ्या मार्गावर स्वच्छता करण्यात आली. त्यांचे कोल्हापूर विमानतळावर आगमन झाल्यानंतर विमानतळावरून ते तपोवन मैदानाच्या दिशेने जाणार आहेत.
यामधील विमानतळावरून मार्गस्थ झाल्याने ते शिवाजी विद्यापीठ रोड सायबर चौक पुढे एसएससी बोर्ड ते पुढे हाॅकी स्टेडियम ते संभाजीनगर मार्गावरून तपोवन मैदानात दाखल होतील. ही सभा पार पडल्यानंतर 6.30 वाजता कोल्हापुरातून मुंबईकडे रवाना होणार आहेत. दरम्यान, अपर पोलिस महासंचालक सुखविंदर सिंग यांनी बंदोबस्ताचा आढावा घेतला आहे.