कराडच्या हॉकर्स झोनचा आराखडा कागदावरच

कराड  -दहा वर्षापासून रखडेलेला येथील हॉकर्स झोनचा प्रश्न मार्गी लागल्याचे जाहीर करूनही तब्बल सात महिने झाले. मात्र, अद्यापही तो प्रश्न मार्गी लागलेला नाही. निर्णय होवूनही 10 वर्षात तब्बल पाचव्यांदा अमंलबजावणी न झाल्याने हॉकर्स झोनचा आराखडा कागदावरच राहिला आहे. पालिका व पोलिसांमध्ये समन्वय नसल्याने किमान डझनभर बैठका होवूनही तोडगा निघालेला नाही.

मार्चला पहिल्या टप्प्यात बसस्थानक परिसरात 107 हातगाडा धारकांसाठी हॉकर्स झोन होणार अशी घोषणा झाली. मात्र त्याची अमंलबजावणीच झाली नाही. लॉकडाऊन, करोनाचे ग्रहण लागल्यानेही तो प्रकल्प रखडला. मात्र, अनलॉकच्या काळात आत्ता पालिका, पोलिसांचा समन्वय नसल्याने हॉकर्स झोनची घोषणा हेवेतच विरली आहे.

नगराध्यक्षा रोहणी शिंदे, उपाध्यक्ष जयवंत पाटील, जनशक्तीचे नेते राजेंद्र यादव, तत्कालीन मुख्याधिकारी यशवंत डांगे, पोलीस उपाधिक्षक सुरज गुरव, पोलीस निरिक्षक बी. आर. पाटील, विरोधी पक्षनेते सौरभ पाटील, नियोजन सभापती विजय वाटेगावकर, महिला सभापती स्मिता हुलवान, बांधकाम सभापती किरण पाटील, आरोग्य सभापती महेश कांबळे, ज्येष्ठ नगरसेवक विनायक पावसकर, फारूक पटवेकर यांच्या उपस्थितीत सुमारे अडीच तास मॅरेथॉन चर्चा झाली होती.

त्यात मुख्याधिकारी डांगे व उपाधीक्षक गुरव यांची भूमिका महत्वाची होती. त्या दोघांचाही बदली झाल्याने तो प्रश्न मागे पडला आहे. त्यामुळे पहिल्यांदा पदाधिकाऱ्यांची अनिच्छा, त्यानंतर करोना, लॉकडाऊमुळे ग्रहण तर आता अधिकाऱ्यांच्या बदलीने हॉकर्स झोनच्या प्रश्नाला खो घाताला आहे, अशीच स्थिती पालिकेत आहे. पोलिस व पालिकेचा समनाव्य कमी झाल्याने त्या प्रश्नात कोमीच हात घालण्यास तयार नाही. त्यामुळेही अडचणी येत आहेत.

तब्बल 10 वर्षापासून पालिकेत किमान 15 मॅरेथॉन बैठका पार पडल्या मात्र हकर्स झोनचा प्रश्न काही केल्या मार्गी लागत नव्हती. अखेर मार्चमध्ये त्या हॉकर्स झोनच्या पहिल्या टप्पा करण्याची भीष्म प्रतिज्ञा झाली. त्यानुसार बस स्थानक परिसरातील 107 हातगाडाधारकांचे पुनर्वसन होणार होते. त्यासाठी कर्मवीर भाऊराव पुतळ्यामागील मोकळी जागा, शालीमार लॉजकडील रस्ता, नवगृह मंदीराबाहेरील भिंतीची जागा, जुन्या राजमहल टॉकीजच्या बाहेरील जागा, टाऊन हॉलचे जुने प्रवेशव्दार अशा वेगवेगळ्या मोकळ्या जागा सिलेक्‍ट करण्यात आल्या होत्या. तेथे हातगाडीधारकांना हॉकर्स झोन जाहीर केल्याची घोषणा जनशक्ती आघाडीने केली खरी मात्र घोषणेला सात महिने झाले, तरी त्याची अमंलबाजवणी झालेली नाही. लॉकडाऊन, करोनाच्या काळातील ते काम होणे शक्‍य नव्हते, मात्र अनलॉकच्या काळातही त्याकडे कोणी पाहण्यास तयार नसल्याचे दिसून येत आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.