वडगाव मावळ, (वार्ताहर) – कार्ला, मावळ सामुदायिक विवाह सोहळ्याला चाललेल्या कारचा समोरील डाव्या बाजूचा चाक निघाल्याने भीषण अपघात झाला. यात एक तरुणी व ज्येष्ठ महिलेचा गंभीर जखमी झाल्याने मृत्यू झाला. तर, चालकासह चार महिला गंभीर जखमी झाल्या आहेत.. हा अपघात शुक्रवारी (दि. 26) सकाळी 9.30 वाजता अहिरवडे फाटा पुणे-मुंबई महामार्गावर (ता. मावळ) घडला.
सिद्धी संतोष तिकोणे (वय 18, रा. पाटण, ता. मावळ), सीताबाई तुकाराम लालगुडे (वय 60, रा. कुसगाव खुर्द, ता. मावळ) असे अपघात मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. पोलीस निरीक्षक रवींद्र पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, कार्ला येथे सामुदायिक विवाह सोहळ्याला कारमधून जात असताना अहिरवडे हद्दीत पुणे मुंबई महामार्गावर कारचा डाव्या बाजूचा समोरचा चाक निघाल्याने कार अनेकदा पलटी होऊन भीषण अपघात झाला.
या अपघातात सिद्धी तिकोणे व सीताबाई लालगुडे या गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच कामशेत पोलीस निरीक्षक रवींद्र पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक जयश्री भूमकर, पोलीस हवालदार समीर करे व प्रवीण विरणक आदींनी धाव घेतली. जखमींवर पवना हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.