लंडन – युक्रेनचे अध्यक्ष वोलोदायमिर झेलेन्सकी यांनी बुधवारी लंडनला (Zelensky makes surprise visit to UK) अचानक भेट दिली. या भेटीदरम्यान ते ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक आणि ब्रिटनचे राजे चार्ल्स यांचीही भेट घेणार आहेत. याशिवाय ते ब्रिटनच्या संसदेलाही संबोधित करणार आहेत.
रशियाविरोधात सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभुमीवर ब्रिटनने युक्रेनच्या सैन्याला प्रशिक्षण देण्याची जबाबदारी स्विकारली आहे. तसेच युक्रेनच्या लढाऊ विमानांच्या वैमानिक आणि युद्धनौकांवरील खलाशांचे प्रशिक्षण देखील ब्रिटनमधील प्रशिक्षण केंद्रांमधून सुरू आहे. या सहकार्याची व्याप्ती अधिक वाढवण्याचा निर्णय ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी घेतला आहे. त्या पार्श्वभुमीवर झेलेन्सकी यांनी यांनी ब्रिटनला भेट दिली आहे, असे समजते आहे.
– राजे चार्ल्स यांची घेणार भेट
– लष्करी प्रशिक्षणाची व्याप्ती ब्रिटन वाढवणार
सुरक्षिततेच्या कारणास्तव झेलेन्सकी यांच्या भेटीचा कार्यक्रम आगोदर घोषित करण्यात आला नव्हता. राजे चार्ल्स तिसरे यांच्याबरोबरची झेलेन्की यांच्या भेटीचा कार्यक्रमदेखील आगोदर घोषित केला गेला नव्हता, असे बकिंगहॅम राजवाड्याच्या सूत्रांनी म्हटले आहे.
सुनक आणि झेलेन्सकी यांच्यात 10 डाऊनिंग स्ट्रीट येथे लष्करी सहकार्य वाढवण्याच्या मुद्यावर सविस्तर चर्चा होणार आहे. युक्रेनला तातडीने काही महत्वाची शस्त्रे उपलब्ध करून देण्याच्या मुद्यावर यावेळी चर्चा अपेक्षित आहे. झेलेन्सकी यांची ही अचानक भेट म्हणजे युक्रेनची लढाऊवृत्ती आणि ब्रिटन-युक्रेनमधील अतुट मैत्रीचे प्रतिक असल्याचे सुनक यांनी म्हटले आहे.
ब्रिटनकडून युक्रेनच्या सैन्याला प्रशिक्षणाचा इतिहास
2014 पासून ब्रिटन युक्रेनच्या सैन्याला महत्वाचे लष्करी प्रशिक्षण देत आहे. आता या प्रशिक्षणाची व्याप्ती वाढवण्यात येणार असून खलाशी आणि लडाऊ विमानांच्यावैमानिकांनाही ब्रिटन प्रशिक्षण देणार आहे, असे सुनक यांनी म्हटले आहे.
PM Modi Jacket : पंतप्रधान मोदींच्या नव्या जॅकेटची सर्वत्र चर्चा! जाणून घ्या…काय आहे कारण
केवळ अल्पकाळासाठीचे लष्करी उपकरण हाताळणीच्या प्रशिक्षणापुरते हे सहकार्य मर्यादित नसेल. तर यापुढील काळात युक्रेनच्या बरोबरीने ठाम उभे राहण्याची ही ग्वाही आहे, असेही सुनक यांनी म्हटले आहे. चॅलेन्जर-2 रणगाड्यांचे प्रशिक्षण घेण्यासाठी युक्रेनची तुकडी गेल्याच आठवड्यात ब्रिटनमध्ये येऊन दाखल झाली आहे.