लंडन – ब्रिटनमध्ये अनधिकृतपणे प्रवेश करणाऱ्या शरणार्थ्यांना आफ्रिकेतील रवांडामध्ये सोडण्याच्या कारवाईला प्रारंभ होत असल्याची घोषणा ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी आज केली.
अनधिकृत शरणार्थ्यांना रवांडाला घेन जाणारे पहिले विमान १० ते १२ आठवड्यात रवाना होईल, असे त्यांनी म्हटले आहे. मात्र या कार्यवाहीचे संवेदनशीत तपशील उघड केले जाणार नाहीत, असेही त्यांनी स्पष्ट केले.
या शरणार्थ्यांना रवांडाला घेऊन जाण्यासाठी मालवाहू विमान ठरवण्यात आले आहे. या शरणार्त्यांना कोठे उतरवायचे याचे ठिकाण निश्चित केले गेले असून अधिकारी, कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण देखील पूर्ण झाले आहे.
यासंदर्भातील विधेयकावर सोमवारी सविस्तर चर्चा केली जाणार आहे, असेही सुनक यांनी सांगितले. शरणार्थ्यांना रवांडात सोडणे हे सुक्षित असल्याचे या विधेयकात म्हटले आहे. मात्र त्याला संसदेच्या वरिष्ठ सभागृहातील सदस्यांनी विरोध केला आहे.
मात्र तरिही सुनक आपल्या योजनेवर ठाम आहेत. ब्रिटनमध्ये घुसलेल्या सर्व शरणार्थ्यांना बाहेर काढले जाईल. त्यासाठीच ही योजना आपण राबवणार असल्याचे त्यांनी पुन्हा ठामपणे म्हटले आहे.