नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज संसदेत विशिष्ट जॅकेट घालून आले होते. त्याची चांगलीच चर्चा रंगली होती. हे जॅकेट प्लॅस्टिक बाटल्या रिसायकल करून त्यापासून बनवले गेले आहे.
पंतप्रधान आज सकाळी राज्यसभेत हे जॅकेट घालून बसलेले दिसले. मोदींनी सध्या बंगळुरू येथे सुरू असलेल्या एनर्जी वीक कार्यक्रमात प्लॅस्टिकच्या पुनर्वापरापासून तयार करण्यात आलेल्या युनिफॉर्मचे लॉंचिंग केले होते. हे युनिफॉर्म इंडियन ऑईल कंपनीच्या पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना वितरित केले जाणार आहेत.
Adani Case : माकप खासदाराचा मोदी सरकारला इशारा, म्हणाले “अन्यथा मिस्टर अदानी तुम्हाला…”
हरित विकास आणि ऊर्जा परिवर्तन या विषयावर अधिक जागरूकपणे काम करण्याच्या पंतप्रधान मोदींच्या सूचनेला प्रतिसाद म्हणून हे युनिफॉर्म तयार करण्यात आले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर आज खुद्द पंतप्रधानांनी त्या मटेरिअलपासून बनवलेले जॅकेट परिधान करून सर्वच उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.
मोदींनी घातलेल्या या निळ्या जॅकेटचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून प्लॅस्टिकच्या पुनर्वापरापासून तयार केलेल्या जॅकेटची रिटेल मार्केटमधील किंमत जवळपास 2 हजार रुपये एवढी असल्याचं सांगण्यात येतंय.