Lok Sabha Election 2024 । राजस्थानच्या श्रीगंगानगरमध्ये राहणारा कॉमेडियन श्याम रंगीला वाराणसीमधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात निवडणूक लढवणार आहे. कॉमेडियन श्याम रंगीला यांनी वृत्तवाहिनीशी बोलताना राजकारण येण्या मागचे कारण स्पष्ट केले.
कॉमेडियन श्याम रंगीला म्हणाले, ‘मी वाराणसीला रवाना झालो आहे. तेथे पोहोचल्यानंतर मी फॉर्म भरण्याची प्रक्रिया आणि निवडणूक लढवण्याची रणनीती निश्चित करेन. आजकाल राजकारण कॉमेडीसारखे चालत असल्याने मी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. वाराणसीतून काँग्रेसने अजय राय यांना तिकीट दिले आहे, तर बसपाने सय्यद नियाज अली यांना उमेदवारी दिली आहे.
श्याम रंगीला पुढे म्हणाले, ‘काशीची अवस्था सुरत आणि इंदूरसारखी होऊ नये म्हणून मी हा निर्णय घेतला. पंतप्रधान मोदींच्या विरोधात निवडणूक लढवणाऱ्या विरोधी उमेदवारांनी अर्ज मागे घेतले तरी मी कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढवणार आहे. पंतप्रधानांच्या विरोधात कोणीही निवडणूक लढवू शकतो, ही लोकशाही आहे. मी जनतेच्या पाठिंब्यावर वाराणसीतून निवडणूक लढवणार आहे. लवकरच मी माझ्या युट्यूब चॅनलवर निवडणूक लढवण्याची संपूर्ण प्रक्रिया जाहीर करेन.’
हे वाचले का ? मायावतींनीही दिल्लीच्या सातही लोकसभा जागांवर उभे केले ‘उमेदवार’