Share Market| भारतीय शेअर बाजारात एक दिवसाच्या सुट्टीनंतर आज गुरुवारी चढ-उतार पाहायला मिळाले. सुरवातीला सेन्सेक्स-निफ्टी घसरणीनंतर आता तेजीकडे वळले आहेत. त्यानुसार बँक निफ्टी, फायनान्शिअल सर्व्हिसेस, एफएमसीजी, ऑइल अँड गॅस सेक्टर, ऑटो, पीएसयू बँक या क्षेत्रांमध्ये जोरदार व्यापार सुरू आहे. आज BSEचा सेन्सेक्स 133.36 अंकांनी किंवा 0.18 टक्क्यांनी वाढून 74,616 वर आणि NSEचा निफ्टी 47.15 अंकांनी किंवा 0.21 टक्क्यांनी वाढून 22,652 वर पोहोचला आहे.
कोणत्या शेअर्समध्ये वाढ ? Share Market|
गुरुवारी शेअर बाजाराच्या सुरुवातीच्या व्यवहारात बीपीसीएल, हीरो मोटोकॉर्प, महिंद्रा, पॉवर ग्रिड, बजाज फिनसर्व्ह, अदानी एंटरप्रायझेस आणि कोल इंडियाचे शेअर्स वधारले आहेत. 50 निफ्टी शेअरपैकी 32 शेअर्स वाढीसह व्यवहार करत आहेत आणि 18 शेअर्समध्ये घसरण होत आहे.
निफ्टीचा टॉप गेनर पॉवरग्रिड आहे जो 2.30 टक्क्यांनी वाढला आहे. BPCL 1.78 टक्के, ग्रासिम 1.53 टक्के आणि M&M 1.36 टक्क्यांनी वर आहे. घसरलेल्या समभागांमध्ये कोटक महिंद्रा बँक सर्वाधिक 3.95 टक्क्यांनी घसरली आहे. याशिवाय हिंदाल्को, मारुती, एचडीएफसी लाईफ आणि टाटा कंझ्युमरच्या शेअर्समध्ये घसरण आहे.
सेन्सेक्समधील 30 शेअरपैकी 19 शेअर्समध्ये वाढ तर 11 शेअरमध्ये घट दिसून येत आहे. वाढत्या शेअर्समध्ये पॉवरग्रिड, एमअँडएम, एशियन पेंट्स, सन फार्मा, एनटीपीसी, एचडीएफसी बँक, नेस्ले, टाटा स्टील, बजाज फिनसर्व्ह, एसबीआय, टाटा मोटर्स, जेएसडब्ल्यू स्टील, एचयूएल, आयटीसी, बजाज फायनान्स, अल्ट्राटेक सिमेंट, एचसीएल टेक, रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअरमध्ये तेजी दिसून येत आहे.
बीएसईचे मार्केट कॅप ऐतिहासिक शिखरावर Share Market|
बीएसईचे मार्केट कॅप 407.80 लाख कोटी रुपयांवर आले असून जे तेजीच्या काळात 408 लाख कोटी रुपयांच्या ऐतिहासिक शिखरावर पोहोचले होते. 35 शेअर्समध्ये 52 आठवड्यांचा उच्चांक दिसत आहे आणि 8 शेअर्स एका वर्षाच्या नीचांकी पातळीवर गेले आहेत. सकाळी 9.35 वाजता बीएसईवर 2986 शेअर्समध्ये ट्रेड होताना दिसत आहे, त्यापैकी 1810 शेअर्सचे तेजीने व्यवहार होत आहेत. त्यांपैकी 1051 शेअर्समध्ये घसरण दिसून आली तर 125 शेअर्समध्ये कोणताही बदल न होता व्यवहार होत आहेत.
हेही वाचा:
उच्चांकी दरवाढीनंतर सोन्याचे भाव कोसळले; जाणून घ्या आजचे ‘दर’