मुंबई – मुंबईतील बोरिवली येथील योगीनगर परिसरातील झोपडपट्ट्यांना भीषण आग लागली आहे. या आगीची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या असून या आगीचे कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे. अग्निशमन दलाचे जवान आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करत आहेत.
अधिक माहितीनुसार, बोरिवलीमधील योगीनगर परिसरात असलेल्या विचारे कंपाऊंडमधील झोपडपट्ट्यांना बुधवारी दुपारच्या सुमारास ही आग लागली. या आगीमध्ये झोपडपट्ट्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या आगीतील जीवितहानीची माहिती अद्याप अस्पष्ट आहे. ज्या झोपडपट्टीला आग लागली आहे, त्या बाजूला अनेक चाळी आहेत. त्यामुळे ही आग पसरण्याची भीती वर्तवली जात आहे.