नवी दिल्ली – युक्रेनचे अध्यक्ष वोलोदायमिर झेलेन्सकी आणि युक्रेनच्या भेटीवर असलेले ग्रीसचे पंतप्रधान किरियाकोस मित्सोताकिस हे दोघेही आज रशियाने केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यातून थोडक्यात बचावले.
हे दोघेही काळ्या समुद्रातील ओडेसा बंदराच्या भेटीला गेले असताना हा क्षेपणास्त्र हल्ला झाला होता. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे दोन्ही नेत्यांबरोबरच्या सुरक्षा रक्षकांची मोठा धावपळ झाली. दोन्ही नेत्यांच्या वाहनांच्या ताप्यापासून अवघ्या ५०० मीटर अंतरावर या क्षेपणास्त्राचा स्फोट झाला होता.
या क्षेपणास्त्र हल्ल्यामध्ये ५ जण ठार झाले आणि अनेक जण जखमी झाले. मात्र झेलेन्सकी आणि मित्सोताकिस दोघांनाही या क्षेपणास्त्र हल्ल्यामध्ये कोणतीही इजा झाली नाही, असे युक्रेनच्या नौदलाने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.