लंडन – भारतीय चित्रपट निर्माती झोया अख्तर आणि ब्रिटीश भारतीय शेफ अस्मा खान यांचा लंडनमध्ये स्मान करण्यात आला आहे. ब्रिटीश-भारतीयांच्या वार्षिक सन्मानाच्या समारंभामध्ये या दोघांचा सन्मान करण्यात आला.
ब्रिटनमध्ये उच्च शिक्षण घेतलेल्या आणि आंतरराष्ट्रीय नावलौकिक मिळवलेल्या माजी भारतीय विद्यार्थ्यांचा या समारंभात सन्मान केला जात असतो. भारतातील ब्रिटीश कौन्सिल आणि ब्रिटन सरकारच्या सहयोगातून या सोहळ्याचे आयोजन केले जात असते.
ब्रिटनमधून उच्च शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांची संघटना असलेल्या नॅशनल इंडियन स्टुडंटस ऍन्ड ऍल्युमनी युनियनच्यावतीने या समारंभाचे आयोजन दरवर्षी केले जात असते.
या आठवड्यात झालेल्या समारंभामध्ये कला, क्रीडा, उद्योग आणि वैद्यकशास्त्रातील माजी विद्यार्थ्यांना द ऑनर ऑफ एज्युकेशन पुरस्कार देऊन सन्मान केला गेला.
हे यश मिळवणारे केवळ प्रतिष्ठित सन्मानाचे प्राप्तकर्ते नाहीत, तर ते आपल्या समाजात शिक्षण आणि सीमापार सांस्कृतिक देवाण घेवाण करू शकणारे माननीय व्यक्ती आहेत, असे आयोजकांनी यावेळी सांगितले.