Nashik Lok Sabha Election 2024| नाशिक लोकसभा मतदार संघातून काल 1 मे रोजी शिंदे गटाकडून उमेदवाराचे नाव घोषित करण्यात आले होते. मागील काही दिवसांपासून महायुतीत नाशिकच्या जागेवरून तेढ निर्माण झाला होता. अखेर हेमंत गोडसे यांना येथून देण्याचा निश्चय करण्यात आला. सलग तिसऱ्यांदा नाशिक मतदार संघातून हेमंत गोडसे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. उमेदवारी जाहीर होताच गोडसे यांच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला होता. त्यानंतर आज गुरुवारी हेमंत गोडसे उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
डॉ. भारती पवार आणि हेमंत गोडसे दाखल करणार उमेदवारी अर्ज
इगतपुरी तालुक्यातील घाटनदेवीपासून नाशिक शहराकडे वाहनांची ‘महाविजय रॅली’ काढण्यात आली आहे. आज नाशिकचे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार हेमंत गोडसे यांच्यासह दिंडोरीच्या भाजपच्या उमेदवार डॉ. भारती पवार देखील आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादी अजित गटाचे मंत्री छगन भुजबळ उपस्थित राहणार आहेत.
नाशिकच्या जागेवर शिवसेनेसह भाजप आणि राष्ट्रवादीने दावा केला होता. अखेर नाशिकची जागा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मिळूवन दाखवली. आता सलग तिसऱ्यांदा हेमंत गोडसे लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. Nashik Lok Sabha Election 2024|
दरम्यान, महाविकास आघाडीकडूशिवसेना ठाकरे गटाने सिन्नरचे माजी आमदार राजाभाऊ वाजे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. तर वंचित बहुजन आघाडीकडून करण गायकर निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तसेच शांतीगिरी महाराजांनी देखील अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यामुळे नाशिक मतदार संघातील लोकसभा निवडणूक रंजक ठरणार आहे. Nashik Lok Sabha Election 2024|
हेही वाचा: