Lok Sabha Election 2024 । अजित पवार गटाचे नेते धनंजय मुंडे यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली होती. त्यांच्या याच टीकेला शरद पवारांनी उत्तर दिलंय. धनंजय मुंडे हा लायकी नसलेला माणूस” असे वक्तव्य केले आहे.
“धनंजय मुंडे म्हणजे लायकी नसलेला माणूस. त्यांना कशा कशांतून बाहेर काढलं आहे हे जर सांगितलं तर त्यांना बाहेर फिरणं मुश्कील होईल. एकंदरीत त्यांनी केलेले उद्योग आणि इतर गोष्टींबाबत मी आत्ता बोलू इच्छित नाही. एका लहान कुटुंबातला उदयोन्मुख तरुण नेता म्हणून त्यांना हाताला धरुन विरोधी पक्षनेत्याची जबाबदारी दिली. लोकांची नाराजी होती तरीही मी त्यांना ही जबाबदारी दिली. हे सगळं माहीत असतानाही ते माझ्यावर व्यक्तिगत हल्ले करु लागले आहेत. कुटुंबावर हल्ले करत आहेत. मी त्यांच्याबाबत आज जे बोललो ते शेवटचं यापुढे बोलणार नाही.” असे शरद पवारांनी म्हणाले होते. यावर आता अमोल मिटकरी यांनी सडेतोड उत्तर दिल आहे.
Lok Sabha Election 2024 । नेमकं काय अमोल मिटकरी
‘धनंजय मुंडे यांचा लहान समाज घटकांतील व्यक्ती म्हणून उल्लेख शरद पवार यांनी केला. त्यामुळे माझ्यासारख्या लहान व्यक्तीला वैयक्तिक दुःख झालं आहे, ते पुढे म्हणाले राष्ट्रवादी काँग्रेसचा एक खासदार होता. पण आत्ता आम्हाला महायुतीमध्ये चार जागा या मिळाल्या आहेत. त्यामुळे ही संख्या एक पेक्षा जास्त आहे. आम्ही देखील सात जागांची मागणी केली होती. पण आम्हाला चार जागा मिळाल्या आहेत. आम्ही गडचिरोली, परभणीची जागा लढवली असती तर आमचा खासदार हा निवडणून आला. असता पण आत्ता महायुतीमध्ये आम्ही संतुष्ट आहोत, असं म्हणत मिटकरींनी प्रतिक्रिया दिली आहे.’
हे वाचाल का ? कॉमेडियन श्याम रंगीला वाराणसीमधून PM मोदींविरोधात लढवणार ‘निवडणूक’