जामखेड प्रतिनिधी – आमदार रोहित पवार यांचे खंदे समर्थक युवा नेते अमर चाऊस यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या अल्पसंख्याक जिल्हाउपाध्यक्षपदी निवड करण्यात आली असून प्रदेशाध्यक्ष जावेद हबीब यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले.
नगर येथील राष्ट्रवादी काँग्रेस भवनात बैठक आयोजित करण्यात आली होती यावेळी जेष्ठ नेते दादाभाऊ कळमकर. माजी महापौर अभिषेक कळमकर शौकत तांबोळी. अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष आथर पठाण आदीसह जिल्हातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते यावेळी अल्पसंख्याक जिल्हास्तरीय कार्यकारणी जाहीर करण्यात आली यामधे अमर चाऊस यांचा जिल्हाउपाध्यक्षपदी निवड करण्यात आली यानिवडीबददल आमदार रोहित पवार यांनी अमर चाऊस यांचे अभिनंदन केले.
पदाच्या माध्यमातून अल्पसंख्याकांना न्याय देणार
राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार. प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील आ रोहित पवार यांच्या माध्यमातून मला मोठी जबाबदारी पक्षाने दिली आहे या पदाच्या माध्यमातून अल्पसंख्याक समाजातील विविध प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी प्रयत्न करणार आहे – अमर चाऊस