Congress Candidates List । भारतीय जनता पक्षाने लोकसभा निवडणुकीसाठी 195 नावांची पहिली यादी जाहीर नुकतीच केली. त्यानंतर आता काँग्रेस लोकसभा निवडणुकीची पहिली यादी जाहीर करणार आहे. काल रात्री उशिरापर्यंत काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक झाली. ज्यामध्ये अनेक नावांना मंजुरी देण्यात आली आहे. आज काँग्रेसची पहिली यादी जाहीर केली जाण्याची शक्यता वर्तवली जातीय.
भाजपप्रमाणेच काँग्रेसच्या पहिल्या यादीतही अनेक दिग्गजांची नावे असतील. पक्षाचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांचे नाव काँग्रेसच्या पहिल्या यादीत असेल. ते वायनाडमधून निवडणूक लढण्याची शक्यता आहे. सध्या राहुल गांधी वायनाडमधून खासदार आहेत. राहुल गांधींशिवाय पक्षाने पहिल्या यादीत जवळपास 40 नावांना मंजुरी दिली आहे.
केरळमधील सर्व खासदारांना मिळणार आणखी एक संधी Congress Candidates List ।
काँग्रेसच्या पहिल्या यादीत ज्या 40 उमेदवारांची नावे येऊ शकतात. त्यात तिरुअनंतपुरममधील शशी थरूर आणि छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्या नावांचीही चर्चा झालीय. या दोन दिग्गजांच्या नावाचाही पहिल्या यादीत समावेश होऊ शकतो. काँग्रेस पुन्हा केरळच्या सर्व खासदारांना तिकीट देण्याचीही शक्यता आहे. त्याचबरोबर कर्नाटक आणि तेलंगणातील 6-6 जागांसाठी उमेदवारांची नावेही सीईसीच्या बैठकीत ठरविण्यात आलीयेत.
‘या’ राज्यांतील उमेदवारांवर एकमत Congress Candidates List ।
काँग्रेस पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीत मणिपूर, नागालँड, सिक्कीम आणि मेघालयातील उमेदवारांवर एकमत झाले आहे. पहिल्या यादीत त्यांची नावेही जाहीर केली जाऊ शकतात. मात्र, उमेदवारांच्या नावाचा मुद्दा दिल्लीतच अडकला आहे. सीईसी बैठकीतून बाहेर पडल्यानंतर पक्षाचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांनी केरळ, कर्नाटक, तेलंगणा, छत्तीसगड आणि लक्षद्वीपमधील उमेदवारांची नावे निश्चित केली असल्याचे सांगितले होते. ही नावे आज कधीही जाहीर होऊ शकतात. याशिवाय काँग्रेस पक्षाने केंद्रीय निवडणूक समितीच्या पुढील बैठकीची तारीखही सांगितली आहे. काँग्रेस सीईसीची पुढील बैठक 11 मार्च रोजी होणार आहे.
हेही वाचा
राज्यातील 19 जागांवर लढण्याची काँग्रेसची तयारी; ‘या’ मतदारसंघातील उमेदवारांचा घेतला आढावा