Devendra Fadnavis । आगामी लोकसभा निवडणूका उंबरठ्यावर येऊन ठेपल्या आहेत. दरम्यान, या निवडणुकीत महाराष्ट्रातल्या ४८ पैकी ४५ जागा जिंकणार असल्याचा दावा भाजपने केलाय. दुसरीकडे महाविकास आघाडीनेही निवडणुकीची जोरदार तयारी केलीय. त्यातच सध्या बैठका, जागावाटप, उमेदवारी यावर चर्चेच्या फेऱ्या, दिल्लीच्या वाऱ्या असं सगळंच सुरु आहे. दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पक्षात येणारे लोक, तिकिट वाटप आणि विरोधक या तिघांसाठी एका गाण्याच्या तीन ओळी गात विरोधकांना टोला लगावला.
काय म्हणाले देवेंद्र फडणवीस? Devendra Fadnavis ।
एका कार्यक्रमासाठी उपस्थित असताना देवेंद्र फडणवीस यांनी “सुमन कल्याणपूर यांनी १३ विविध भाषांमध्ये गाणी म्हटली आहेत. त्यांचं कुठलं गाणं चांगलं हे ठरवायची वेळ येते तेव्हा अनेक प्रश्नांची उत्तरंही आम्हाला सापडतात, असे त्यांनी म्हटलं.
“जिंदगी इम्तहान लेती है” Devendra Fadnavis ।
जेव्हा अनेक पक्ष आमच्याकडे येतात, तेव्हा आम्हाला म्हणावंसं वाटतं “आज कल तेरे मेरे प्यार के चर्चे हर जबानपर”, जेव्हा आम्ही तिकिट वाटपासाठी बसतो तेव्हा म्हणावंसं वाटतं “तुम्हे प्यार करते हैं करते रहेंगे..” आणि निवडणुका पूर्ण झाल्या की “जिंदगी इम्तहान लेती है” हे आमचे विरोधक म्हणतील” असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. दरम्यान, या गाण्याच्या माध्यमातून त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला.
हेही वाचा
“जगातील १०० देशांना पंतप्रधान मोदींनी कोविड लस दिली, आज देखील त्यांचे आभार’ – देवेंद्र फडणवीस
Lok Sabha Election 2024 : ‘यंदाची निवडणूक ही भाजपच्या नव्हे, भारताच्या विजयाकरता’ – देवेंद्र फडणवीस