Weather Update| देशातील अनेक भागात सध्या उन्हाच्या झळा जाणवत आहे. तर काही ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मुंबई, ठाणे आणि कोकणात हवामान विभागाने पुढील 24 तासात उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. राज्यात एकीकडे उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला असताना मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये येत्या काही दिवसांत उष्णता वाढण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. या जिल्ह्यांतील नागरिकांना पुन्हा एकदा कडाक्याच्या उन्हाचा सामना करावा लागणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
मुंबई, ठाण्यासह कुठे असणार उष्णतेच्या लाटेचा इशारा ? Weather Update|
गेल्या दोन दिवसात महाराष्ट्रातील अनेक भागात तापमानाचा पारा 40 अंश सेल्सिअस पलिकडे गेला आहे. हवामान विभागाच्या आकडेवारीनुसार, राज्याच्या पश्चिम आणि मध्य भागात सर्वाधिक उच्च तापमानाची नोंद झाली आहे. आज 1 मे रोजी सलग तिसऱ्या दिवशी रायगड, मुंबई उपनगर आणि ठाण्यासह कोकणात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे.
तर 3 मेपासून राज्यात तापमान वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांना उन्हात बाहेर पडताना खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.हवामान खात्याच्या अंदाजानुसार, मुंबई, ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यात आजपासून पुढील 24 तासात उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे.
मराठवाडा आणि विदर्भात बरसणार पावसाच्या सरी Weather Update|
एकीकडे राज्यात उन्हाचा कडाका असताना काही ठिकाणी अवकाळी पावसाचे संकट कायम आहे. मराठवाडा आणि विदर्भाच्या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ आणि सोसाट्याचा वारा यासह हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. लातूर, यवतमाळ, अहमदनगर, सोलापूर, बीड, धाराशिव, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यात विविध ठिकाणी जोरदार वाऱ्यासह हलक्या पाऊस बरसण्याची शक्यता आहे.
हेही वाचा: