कर्करोग ( yoga good for cancer patients ) उपचारामध्ये मुख्यतः रेडिएशन थेरपी दिली जाते, पण या उपचारांचे काही दुष्परिणामही होतात. त्यामध्ये रुग्णाला अत्यंतिक अशक्तपणा येतो. हा दुष्परिणाम कमी करण्याची ताकद रुग्णांना ( yoga good for cancer patients ) योगासनांमधून मिळू शकते, असे नुकत्याच एका संशोधनातून पुढे आले आहे.
युनिव्हर्सिटी ऑफ टेक्सास एमडी अँडरसन कॅन्सर सेंटर येथे प्रा. लोरेनझो कोहेन यांच्या नेतृत्वाखाली संशोधन करण्यात आले. याविषयी जरनल ऑफ क्लिनिकल ऑकॉलॉजीमध्ये निबंध प्रसिद्ध झाला आहे.
शरीरात तणाव वाढविणारे हार्मोन्स योगासनांमुळे नियंत्रित राहू शकतात, असे या संशोधनात आढळून आले. सुमारे पाच हजार वर्षांपूर्वीपासून भारतात योगासने ( yoga good for cancer patients ) करण्यात येत असल्याचे मानले जाते. यामध्ये शारीरिक व्यायामाबरोबरच श्वासाचे व्यायामही ( yoga good for cancer patients ) होतात. या संशोधनासाठी 191 रुग्णांचा अभ्यास करण्यात आला.
त्यातील ज्या महिला नियमित योगासने ( yoga good for cancer patients ) करत होत्या, त्या रेडिएशन नंतर येणाऱ्या अशक्तपणाला अधिक खंबीरपणे तोंड देऊ शकत होत्या. एकंदर त्रास कमी होत असल्याचे या रुग्णांनी सांगितले. इतर रुग्णांपेक्षा योग ( yoga good for cancer patients ) करणाऱ्या रुग्णांची एकंदर तब्येत अधिक चांगली असल्याचे या संशोधनात लक्षात आले.