नगर -भाजप ओबीसी मोर्चाच्या माध्यमातून सर्व कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन समाजातील सर्व ओबीसी घटकातील पिडित, वंचित घटकांसाठी जिल्ह्यात काम करणार आहोत. भाजप पक्षाचे विचार-आचार घराघरापर्यंता पोहचविण्यासाठी गाव तेथे शाखा, घर तेथे कार्यकर्ता ही योजना राबविण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्ह्यातील प्रश्न सोडविण्यासाठी एकत्रित काम करावयाचे आहे, असे ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष संतोष रायकर यांनी म्हटले.
भाजपाचे जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच ओबीसी मोर्चाची बैठक पारपडली झाली. रायकर यांनी नूतन कार्यकारिणी जाहीर केली.
कार्याकारिणी पुढील प्रमाणे-उपाध्यक्ष : अंबादास ढाकणे (शेवगांव), सचिन मेहेत्रे (राहुरी), काकासाहेब अनारसे (कर्जत), प्रमोद भांडकर (पाथर्डी), पोपटराव लोंढे (पारनेर), काकासाहेब कदम (श्रीगोंदा), सरचिटणीस संघटन : काशिनाथ ओमासे (जामखेड). सरचिटणीस : दत्तात्रय शिंदे (नगर), चिटणीस – विजय कानडे (राहुरी), सुनिल हजारे (जामखेड), नवनाथ कोथिंबीरे (श्रीगोंदा), सुनिल अन्दुरे (पाथर्डी), विलास जांभुळकर (कर्जत), बाळासाहेब सुसे (शेवगांव), खजिनदार : नारायण घोंगडे (राहुरी), प्रसिद्धीप्रमुख : बाळासाहेब नजन (शेवगांव),
कार्यालयीन प्रमुख : जगदीश जाधव (श्रीगोंदा), महिला आघाडी : महिला संपर्कप्रमुख : डॉ.कांचन खेत्रे (कर्जत). जिल्हा कार्यकारिणी सदस्य : संतोष भुजबळ (शेवगांव), सोपान कुलांगे (नगर), डॉ.विलास राऊत (कर्जत), रामदास बनकर (श्रीगोंदा), संजय वाघमोडे (श्रीगोंदा), रवींद्र राशिनकर (शेवगांव),
अभिजित गुजर (पाथर्डी), बाळासाहेब मेहेत्रे (नगर), दिलीप नष्टे (कर्जत), बाजीराव गोपाळघरे (जामखेड), नारायण घोंगडे (राहुरी), दिनेश काळे (पारनेर), रोहिणी आरडे (श्रीगोंदा), सुनिता वसंत जगताप (पारनेर), आशा वाघ (कर्जत), संगीता घोडेकर (श्रीगोंदा), श्यामराव घोलप (नगर).