कोलोंबो – अदानी ग्रीन एनर्जी कंपनीकडून पुढील २० वर्षे वीज खरेदी करण्याला श्रीलंकेच्या सरकारने मान्यता दिली आहे. या करारानुसार अदानी ग्रीन एनर्जी देशाच्या इशान्य भागामध्ये ४८४ मेगावॅट उर्जा निर्मितीसाठी पवन उर्जा स्थानक उभारणार आहे.
या पवन उर्जेसाठी ताशी प्रति किलोवॅट ०.०८२६ डॉलर इतका दर निश्चित करण्यात आला आहे. ही रक्कम स्थानिक रुपयांच्या हिशोबात दिली जाणार आहे, असे उर्जा मंत्री कांचना विजयसेकरा यांनी एक्सवरच्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
खरेदीची किंमत ३९.०२ श्रीलंका रुपये प्रति किलो वॅट तासाने उर्जेच्या सध्याच्या सरासरी खर्चापेक्षा कमी असेल, असेही त्यांनी म्हटले आहे.
इशान्य श्रीलंकेतील मन्नार आणि पूनीरिनमध्ये ४८४ मेगावॅट क्षमतेच्या पवन ऊर्जा केंद्रांच्या विकासाला मार्च २०२२ मध्ये कॅबिनेटची मंजुरी मिळाली आहे.
भारतातील अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेडसोबतच्या कराराला मंजुरी दिल्यानंतर, या कंपनीने सादर केलेल्या प्रकल्प प्रस्तावाचे मूल्यमापन करण्यासाठी मंत्रिमंडळाने एक वाटाघाटी समिती नेमली होती. त्या समितीच्या शिफारशींच्या आधारे, मंत्रिमंडळाने प्रकल्पाच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे.